“Mhada scam goes viral: Pune contractor caught in ‘lach’ controversy”

म्हाडात घर देण्यासाठी 2 लाखांची लाच मागणारा गजाआड : मुख्याधिकारी यांच्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी एकजन ताब्यात
लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे यांची कारवाई ; म्हाडाच्या सदिनिके करिता आरटीजीएस चलन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मागितली लाच
पुणे :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी म्हाडामध्ये कार्यरत असलेला कंत्राटी प्रोजेक्ट मॅनेजर याने सदनिका ताबा देण्याकरिता दोन लाख 70 हजारांची लाच मागितली होती. अभिजीत जिचकार असे लाचखोर कंत्राटी अधिकाऱ्याचे नाव असून मुख्यअधिकारी म्हाडा पुणे यांच्याकरिता पाहिजे असल्याचे सांगितले होते. या सर्व घडामोडीनंतर लाचखोर कंत्राटी प्रोजेक्ट मॅनेजर ला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पुणे बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची कारवाई
तक्रारदार यांना म्हाडा तर्फे लॉटरी पद्धतीने घर मिळाले होते. घराच्या जाहिरातीच्या वेळेस अधिकची रक्कम लागेल याबाबत माहिती नसल्याने तक्रारदार यांना सदनिकेचा वाढीव हप्ता भरता आला नाही. त्यासाठी तक्रारदार यांनी सदनिकेचे फेरवितरन होऊन आरटीजीएस चलन मिळण्यासाठी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) पुणे येथे सविस्तर अर्ज दिला होता. तक्रारदार हे त्याबाबत पाठपुरावा करत होते. तक्रारदार हे म्हाडा, पुणे कार्यालयातील मुख्याधिकारी व कंत्राटी खाजगी इसम अभिजीत जिचकार यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदार यांचेकडे सदनिकेचे फेर वितरण होवून आरटीजीएस चलन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणी होती. या लाचेबद्दल तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, आरोपी कंत्राटी अभिजीत जिचकार यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांची सदनिका पुन्हा वितरित करुन आरटीजीएस चलन काढून देण्यासाठी लोकसेवक मुख्याधिकारी, म्हाडा, पुणे यांच्याकरीता 2 लाख 20 हजार ची व स्वतः करीता 50 हजार ची अशी पंचासमक्ष वाढीव एकूण 2 लाख 70 हजार रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी केली. कंत्राटी अभिजीत जिचकार यांनी तक्रारदार यांचेकडून 2.70 लाख रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर कंत्राटी खाजगी अभिजीत जिचकार यांना अटक करण्यात आली असून, त्यांचेविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करत आहेत.
पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र,अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हि कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.