महाराष्ट्र

Gudi Padwa Wishes in Marathi 2024 : सर्वांना यंदाचा गुढीपाडवा अत्यंत आनंदमयी शुभेच्या यंदाचा गुढी पाडवा आपल्या प्रिय जणांना शुभेच्या देऊन साजरा करू

Gudipadwa Wishes In Marathi  : 9 एप्रिलला गुढी पाडव्याचा आगमन असतो, ज्याने मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रीयन लोक अतिशय आनंदाने हा सण साजरा करतात, मित्रांना आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला शुभेच्छा देऊन हा सन साजरा करू या.

मुंबई: गुढीपाडव्याचा उत्सव हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. देशात, विशेषतः महाराष्ट्रात, हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गुढीपाडवा सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा होतो. चैत्र हिंदू पंचांगातला पहिला महिना आहे. यंदा, गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी साजरा होतो. या दिवसापासून मराठी नववर्ष सुरु होते.

Gudi Padwa Wishes in Marathi

नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!”

“चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !”

“काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी

लोटा चांदीचा, माळ सुगंधी

उभारतो मराठी मनाची गुढी

साधू संतांची पुण्याई

नांदो सुख समृद्धी दारी

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi Padwa Wishes in Marathi 2024

“चैत्राची सोनेरी पहाट

नव्या स्वप्नाची नवी लाट

नवा आरंभ नवा विश्वास

नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

“जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा !”

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

Gudi Padwa Wishes in Marathi 2024

  • नवे वर्ष, नवी सुरुवात… नव्या यशाची, नवी रूजवात…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • नव वर्षाची सुरूवात होवो न्यारी…सुख-समृद्धीने सजो आपली गुढी…हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
  • सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात.. नववर्षाभिनंदन.गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सोनेरी पहाट…उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण, अन् सुखाची बरसात…दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात…गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
  • वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0