मुंबई

Babanrao Gholap In Shinde Gat : नाशिकमधील ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेच्या गळाला

• नाशिक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई :- लोकसभेच्या जागा वाटप संदर्भात उद्धव ठाकरे कडून नाशिक शिर्डी लोकसभा करिता जाहीर केलेल्या उमेदवारावर नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाचा मोठा नेता आज शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे. ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबनराव घोलप आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे असे झाले तर आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का बसणार आहे.

आज संध्याकाळी चार वाजता पक्षप्रवेश आज संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर बबनराव घोलप यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीच्या उमेदवारीत डावल्याने ते ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. भाऊसाहेब चौधरी यांच्या मध्यस्थीने बबनराव घोलप शिंदे गटात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बबन घोलप यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांचीही भेट घेतली होती.

पुत्राचा निर्णयाबाबत अद्याप सस्पेन्स

माजी मंत्री राहिलेले बबनराव घोलप उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहे. मात्र त्यांचे पुत्र योगेश घोलप यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार की उद्धव ठाकरे बरोबर राहणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घोलप यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता आहे.

बबनराव घोलप पाच वेळा आमदार

नाशिकमध्ये नुकतेच झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील बबनराव घोलप उपस्थित नव्हते. तेव्हापासून ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. बबनराव घोलप पाच वेळा आमदार राहिले आहे. 1990 ते 2014 दरम्यान नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले आहे. आता शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तिकीट न मिळाल्याने ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहे.बबन घोलप हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी मंत्रीपदही भूषविले आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यानच्या काळात खासदार हेमंत गोडसेंसह शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला. पण, घोलप यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0