MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्य समन्वय यादी जाहीर
•लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचा प्रचार करणार असल्यामुळे प्रचारकरीता समन्वय यादी जाहीर करण्यात आली
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेाकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलाय. या पाठिंब्याच्या घेतलेल्या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी राज ठाकर यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहेत. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आलीय. संबंधितांच्या नावांची यादी महायुतीला देण्यात येणार आहे. ही यादी जाहीर करत मनसेने आपल्या पक्षातील नेत्यांना काही सुचना दिल्यात. इतर पक्षातील पदाधिकारी प्रचारात सहभागी होण्यासाठी विचारपूस करत असतील तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी नेमून समन्वयकांशी संपर्क करून द्यावा अशा सुचना देण्यात आलीय.
कोणत्या मतदारसंघासाठी कोण कोणते समन्वयक आहेत याची यादी खालीलप्रमाणे आहे.
पालघर – अविनाश जाधव
भिवंडी /कल्याण – आमदार राजू पाटील, अविनाश जाधव
ठाणे- अभिजित पानसे
पुणे – अमित राज ठाकरे, राजेंद्र (बाबू) वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे
नाशिक/दिंडोरी – अभिजित पानसे,किशोर शिंदे,गणेश सातपुते
जळगांव / रावेर -अभिजित पानसे
शिरूर – राजेंद्र (बाबू) वागस्कर,अजय शिंदे
मावळ-नितीन सरदेसाई,रणजित- शिरोळे ,अमेय खोपकर
रायगड-नितीन सरदेसाई,संदीप देशपांडे
रत्नागिरी / सिंधुदुर्ग – शिरीष सावंत, नितीन सरदेसाई , .अविनाश जाधव
शिर्डी / नगर – बाळा नांदगांवकर, संजय चित्रे
संभाजीनगर / जालना / धाराशिव / लातूर/ बीड / परभणी / नांदेड / हिंगोली- बाळा नांदगांवकर, संतोष नागरगोजे
बुलढाणा / अकोला / अमरावती / वर्धा / यवतमाळ – संदीप देशपांडे
बारामती / सोलापूर / माढा – दिलीप धोत्रे, ॲड.सुधीर पाटसकर
सांगली / सातारा / कोल्हापूर / हातकणंगले – बाळा नांदगांवकर,अविनाश अभ्यंकर
धुळे / नंदुरबार – अभिजित पानसे, ॲड.जयप्रकाश बाविस्कर, अशोक मुर्तडक