Coastal Road Inauguration Today By CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन, आता 40 मिनिटांचे अंतर काही मिनिटांत कापणार
•कोस्टल रोडच्या (छत्रपती संभाजी महाराज) पहिल्या टप्प्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचे उद्घाटन झाल्यानंतर आता नागरिकांना वाहतूककोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
मुंबई :- मुंबईकरांना वाहतुकीपासून दिलासा देण्यासाठी, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिजनंतर, राज्य सरकारने मुंबईकरांना देशातील पहिला कोस्टल रोड भेट दिला आहे. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन त्याच्या उद्घाटनानंतर वरळी ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास अवघ्या 9 ते 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी 40 मिनिटे लागायची. Coastal Road Inauguration Today By CM Eknath Shinde
कसा आहे कोस्टल रोड?
कोस्टल रोड आणि पर्यायाने मुंबईचे संरक्षण करणारी समुद्र भिंत श्रीलंका आणि फ्रान्स या देशातील आधी झालेल्या कामांचा अभ्यास करून तयार करण्यात आलेली आहे. समुद्रात भिंत बांधताना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविविधतेला पूरक असे निवडले गेले आहेत. समुद्राच्या लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र ही भिंत तयार करताना वापरण्यात आले आहे. त्यामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटांपासून कोस्टल रोड आणि मुंबईला वाचवता येणे शक्य होणार आहे. एकूण 10.58 किमी चा हा मार्ग आहे# त्यामध्ये एकूण आठ मार्गिका असून त्यामध्ये जाणाऱ्या चार आणि येणाऱ्या चार अशा मार्गिकांचा समावेश आहे. तर बोगद्यामध्ये देखील तीन अधिक तीन अशा मार्गिका करण्यात आलेल्या आहेत. भरव टाकून तयार करण्यात आलेला रस्ता 4.35 किमीचा आहे तसेच पुलांची लांबी 2.19 किमी तर बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.19 किमी इतकी आहे. Coastal Road Inauguration Today By CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या या कोस्टर्ड रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आधीच्या सरकारने या मार्गांमध्ये केवळ खोडा घालण्याचे काम केले असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच मुंबईकरांना सुविधा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मच्छीमारांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्री एकदा शिंदे यांनी केला. काही लोक म्हणतात की, इकडून निवडणूक लढवतो, तिकडून लढवतो, मात्र आधी ज्या ठिकाणी निवडून आले आहात त्या ठिकाणच्या लोकांचे, नागरिकांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे, यावर माजी मुख्यमंत्र्यांचा विश्वास नव्हता, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. हा कोस्टल रोड उभारणीला हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. Coastal Road Inauguration Today By CM Eknath Shinde