महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election Result: महाराष्ट्रातील कोणत्या दिग्गज जागेवर कोण नेते आघाडीवर कोण नेते पिछाडीवर

पंकजा मुंडे पिछाडीवर, श्रीकांत शिंदे आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live : महाराष्ट्र लोकसभा 2024 निकालाचे कल बीडमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होत्या. पण आता मात्र त्या पिछाडीवर आहेत. पंकजा यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे सध्या आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यापूर्वी याच मतदार संघातून प्रीतम मुंडे खासदार होत्या.

राजाभाऊ वाजे 45000 मतांची आघाडीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीअंती राजाभाऊ वाजे 45000 मतांची आघाडीवर, दिंडोरी मतदार संघातून भास्कर भगरे 5 हजार मतांनी आघाडीवर पवार Maharashtra Lok Sabha Election

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे 25334 मताने पुढे कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे) – 57619 तर वैशाली दरेकर (शिवसेना उबाठा) -32285 मते मिळाली आहेत. तर श्रीकांत शिंदे 25334 मताने पुढे
आहेत.

रावेरात रक्षा खडसेंना 62975 आघाडी रावेरमध्ये रक्षा खडसे 115914 तर श्रीराम पाटील 62975 मते मिळाली आहेत. तर रक्षा खडसे BJP 62975 आघाडी कायम राखली आहे. Maharashtra Lok Sabha Election

ठाण्यात नरेश म्हस्के 19417 मताने आघाडीवर ठाणे लोकसभेत नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे) – 71158 तर राजन विचारे (शिवसेना उबाठा) – 51741 मते मिळाली आहेत. तर नरेश म्हस्के 19417 मताने आघाडीवर आहेत.

सातऱ्यात शशिकांत शिंदे 7202 मतांनी आघाडीवर.. छत्रपती उदयनराजे भोसले (भाजप) – 15983 तर शशिकांत शिंदे (SP गट राष्ट्रवादी) मिळालेली मते – 23185 मते मिळाली आहेत. Maharashtra Lok Sabha Election

भिवंडीत कपिल पाटील 7144 मताने आघाडीवर भिवंडी लोकसभेत कपिल पाटील (भाजप) – 29221 तर बाळ्या मामा म्हात्रे 22077 मते मिळाली आहेत. तर कपिल पाटील 7144 मताने आघाडीवर आहेत. Maharashtra Lok Sabha Election

Web Title : Maharashtra Lok Sabha Election Result: Who is leading in which major seats in Maharashtra, who is behind?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0