Maharashtra Lok Sabha Election : शिंदे गटाच्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दलित उमेदवारांना संधी दिली जात नाही असा आरोप करत टीका
Milind Deora X post For Varsha Gaikwad : शिंदे गटाचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वर्षा गायकवाड यांच्या जागेबाबत टीका करत उद्धव ठाकरे यांच्या दलित द्वेष असल्याचे सांगितले.
मुंबई :- शिवसेना शिंदे गटाच्या राज्यसभेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर जोरदार टीका केली आहे.दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे. त्यामुळे येथून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडांच्या Varsha Gaikwad रुपाने दलित चेहरा दिल्यास नुकसान होऊ शकते, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा Milind Deora यांनी केला. त्यांनी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंसह काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. Maharashtra Lok Sabha Election Update
या ट्विटमध्ये देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात 21 जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे.
आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरु आहे. कारण काँग्रेस आणि उबाठामध्ये दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असे मिलिंद देवरा यांनी म्हणत टोला लगावला. Maharashtra Lok Sabha Election Update
ठाकरेंना फक्त दलित समाजाची मतं हवीत निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका ठाकरे गटाची दिसून येते. माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळविले की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे, ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो, असे मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ठाकरेंना फक्त दलित समाजाची मतं हवीत निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते. माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळविले की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे, ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो, असे मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. Maharashtra Lok Sabha Election Update