मुंबईक्राईम न्यूज

Nallasopara Crime News : मौल्यवान दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालाचा शोध घेऊन, तक्रारदार यांना परत करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश

नालासोपारा :- 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 02.00 वा. च्या सुमारास महिला नाजली अंन्जुम अबुसाद अंन्सारी (24 वर्षे), हिने नालासोपारा रेल्वे स्टेशन येथुन धानिवबाग नालासोपारा पूर्व येथे एक पेंसेन्जर रिक्षात बसुन आल्या असता त्यांची बैंग रिक्षामध्येच विसरल्या त्या घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात येऊन त्या त्यांची ०१ तोळा वजनाची सोन्याची चैन, ०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके, तसेच 5 हजार‌ रुपये रोख रक्कम असा एकुण 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बॅग मध्ये रिक्षात विसरलेबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रारी मधील अनोळखी रिक्षा व त्यावरील चालकाचा शोध घेणेबाबत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र चनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना सुचना देऊन आदेशित केले होते.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक रिक्षा मधुन तक्रारदार महिला उतरतांना दिसत होती. सदर रिक्षाचा सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने शोध घेतला असता सदर रिक्षा हि नालासोपारा रेल्वे स्टेशन ते सोपाराफाटा अशी प्रचाश वाहतुक करत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सदर रिक्षाचा शोध घेतला असता सदरची रिक्षा हि असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर रिक्षाचे चालकाकडे सदरबाबत विचारणा केली असता त्याने सदर महिलेची मौल्यवान वस्तु असलेली बैंग पोलीसांना दिली असुन पोलीसांनी सदर बैंग व त्यामध्ये असलेल्या मौल्यवान वस्तु तक्रारदार महिला नाजली अंन्जुम अबुसाद अंन्सारी (24 वर्षे) यांना परत दिल्या आहे.

पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखील मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0