महाराष्ट्रमुंबई
Trending

Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसला मिळाला नवा अध्यक्ष, राहुल गांधींचे निकटवर्तीय हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जबाबदारी

Maharashtra Congress Latest News : 18 फेब्रुवारीला दादरच्या टिळक भवन कार्यालयात सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी

मुंबई :- काँग्रेस हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ Harshvardhan Sapkal यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. ते नाना पटोले यांची जागा घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली. मंगळवारी 18 फेब्रुवारी च्या दरम्यान दादरच्या टिळक भवन कार्यालयात सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला आलेले अपयश त्यामुळे नव्या चेहऱ्याला काँग्रेसने यंदा संधी दिल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे 57 वर्षीय सपकाळ हे नाना पटोले यांची जागा घेतील. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी घेत पटोले यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. चार वर्षे ते या पदावर राहिले.त्याचवेळी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यास खरगे यांनी मान्यता दिली.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेचा एक भाग आहेत. स्थानिक स्वराज्याच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या काँग्रेसशी संलग्न असलेल्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.सपकाळ हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सचिवही होते. त्यांनी गुजरात आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यातही पक्षासाठी काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0