क्राईम न्यूजपुणे
Trending
Mawal Firing News : मावळच्या देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार!

Mawal Firing Video : जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना,उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू
मावळ :- मावळ मधील देहूरोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे.Mawal Firing News देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर नंदकिशोर यादव याच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. गोळीबार केलेल्या आरोपींचा शोध सध्या देहूरोड पोलीस घेत आहेत.