मुंबई

  Chandrashekhar Bawankule : औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो…. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Target Uddhav Thackeray : ठाकरेंच्या टिकेला बावनकुळे यांच्याकडून प्रत्युत्तर, ट्विट करत ठाकरेंवर केली टीका

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत Lok Sabha Election गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका करताना दिसत आहे. प्रचार सभा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडे रामराम करत फिरत आहे. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे Chandrashekhar Bawankule  यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. Maharashtra Lok Sabha Election News Live

चंद्रशेखर बावनकुळे यांचे ट्विट

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं.

हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात.

सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली.

कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0