Sanjay Raut : अंबादास दानवे कडवट शिवसैनिक ;संजय राऊत
Sanjay Raut React On Ambadas Danve : छत्रपती संभाजी नगरच्या लोकसभा जागेवरून ठाकरे गटात नाराजीचा सूर
मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोग Lok Sabha Election 2024 आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. भाजपाने वीस लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाने वीस लोकसभा उमेदवारांच्या यादीत महत्त्वाच्या नेत्यांना स्थान दिले महाविकास आघाडीकडून अद्यापही कोणतीही यादी संपूर्ण आल्याने सध्या बैठका सत्र चालू आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरे गटात नाराजीचा सूर असल्याची बातमी बाहेर येत आहे. ठाकरेचे शिल्लेदार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज असल्याचे सार्वत्रिक चर्चा आहे. अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी लोकसभा जागे करिता इच्छुक असल्याचे भावना काही दिवसांपासून व्यक्त करत आहे परंतु छत्रपती संभाजी नगर मधून चंद्रकांत खैरे हे उमेदवार असल्याचे सध्या म्हटले जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Sanjay Raut React On Ambadas Danve
चंद्रकांत खैरे, उद्धव ठाकरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी मी स्वतःही हजर होतो. दानवे नाराज असल्याच्या बातम्या या चुकीच्या आहेत. लोकसभा लढण्याची इच्छा दानवेंनी बोलून दाखवली”, असे संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut React On Ambadas Danve
आम्ही पक्षासाठी काम करतो दरम्यान, चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली तरी पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी काम करेल असेही अंबादास दानवे म्हणाले होते. यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्यांच्यासाठी काम करण्याची आमची परंपरा आहे. कारण आम्ही एखाद्या व्यक्तीसाठी नव्हे तर पक्षासाठी काम करतो”.
भाजपाला संविधान बदलण्यासाठी बहुमत हवे याशिवाय संजय राऊतांनी भाजपवरही टीका केली आहे. भाजपाला देशाचे संविधान बदलण्यासाठी बहुमत हवे आहे. कारण संविधान बदलल्यानंतर ते भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे नाव देतील, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर ईडी म्हणजे भाजपाची हप्ता वसुली एजंट आहे अशी टीकाही राऊतांकडून करण्यात आली आहे. Sanjay Raut React On Ambadas Danve