मुंबई

Deepak Kesarkar Meet Vijay Shivtare : माजी आमदार विजय शिवतारे रुग्णालयात उपचार घेत आहे ; मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली भेट

Deepak Kesarkar Meet Vijay Shivtare : माजी आमदार विजय शिवतारे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची भेट मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांनी घेतली.

पुणे :- बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election जागेवरून अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचे जाहीर करणारे शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल केले आहे.माजी आमदार विजय शिवतारे हे सध्या डायलिसिसच्या प्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंत्री दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी विजय शिवतारे यांची रुग्णालयात भेट घेतली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. पवार कुटुंब वि. सर्वसामान्य माणूस अशी ही लढाई असेल असेही शिवतारे म्हणाले होते.

मंत्री दीपक केसरकर हे भेटीनंतर काय म्हणाले?

कोणत्याही दुखण्याला औषध असते शिवतारे यांची भेट घेतल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, “बारामती लोकसभा अपक्ष लढण्याच्या त्यांच्या ठाम भूमिकेमुळं महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. बऱ्याच दिवसांचे हे राजकीय मतभेद आहेत. पण काही दुखणं असेल तर त्याला औषध असतं, औषध घेतल्यानंतर दुखणं बरं व्हायला वेळ लागतो. तसंच आज कुठलीही राजकीय चर्चा आम्ही केली नाही. प्रथम त्यांची तब्येत व्यवस्थित व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला आणि राहुल शेवाळे यांना पाठवले आहे”, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

बारामतीत लढण्याच्या शिवतारे यांच्या निर्णयावर बोलतांना केसरकर म्हणाले, “विजय शिवतारे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. आम्ही एक परिवार आहोत, मी राज्याचा राज्यमंत्री असताना तेही मंत्री होते. त्यामुळं आमचा एक परिवार आहे आणि परिवारातील व्यक्तीने आपल्या माणसाची काळजी घ्यावी, यासाठी आम्ही भेट घेतली आहे. आज काही राजकीय चर्चा झाली नाही. जेव्हा राजकीय चर्चा करायची असेल तेव्हा बसून एकत्र चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांनी बोलून जरी तोडगा निघाला नसला, तरी दुखण्याला औषध असतं आणि शेवटी ते आमचे नेते आहेत. पक्ष म्हणून ते पक्षाचाही विचार करतील. आम्ही एकत्र आलो एवढं मोठं बंड केले ते बाळासाहेबांचे विचार मानून केलेले आहे” असे केसरकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0