महाराष्ट्र

Laxman Hake OBC Reservation : राज्य सरकारच्या शिष्टमंडळ ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके व वाघमारे यांच्या भेटीला

•Laxman Hake OBC Reservation उपोषणाचा दहावा दिवस, राज्य सरकारच्या पाच मंत्रासह 12 जणांचे शिष्टमंडळ उपोषणकर्ते हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला

जालना :- दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके यांच्याकडून करण्यात आली आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झाले होते.

उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली दरम्यान, हे शिष्टमंडळ दाखल होताच उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली. या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. ओबीसी नेत्यांसोबत काल राज्य सरकारसोबत बैठक झाली. त्यानंतर सरकारचा निरोप घेऊन हे शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले आहे.

लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी उपोषण सुरू केले असून त्यांचे प्रमुख मागणी आहे की,काही करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देवू नये अशी त्यांची मागणी आहे. शिवाय जरांगेंची सगेसोयरेची मागणी मान्य करू नये. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येवू नयेत अशीही त्यांची मागणी आहे. शिवाय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमीही त्यांना सरकारकडून हवी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0