मुंबईठाणे
Trending

Raj Thackeray : ‘मतं अशी चोरली जातात’; EVM हॅकचं प्रात्यक्षिक दाखवत राज ठाकरेंचा मोठा हल्लाबोल

Raj Thackeray ON EVM Machine : ‘शिवाजी महाराजांच्या गडावर नमो टुरिझम सेंटर? सत्तेतून मतांची चोरी होते’, मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी आज ईव्हीएम मशीन हॅक EVM Machine Hack होण्याचे प्रात्यक्षिक सादर करत मतदान प्रक्रियेवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आपण ज्याला मत दिले आहे, ते प्रत्यक्षात दुसऱ्यालाच कसे जाते, हे त्यांनी यावेळी दाखवून दिले. उद्या (1 नोव्हेंबर) होणाऱ्या ‘सत्याच्या महामोर्चा’पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा ‘मतचोरी’चा मुद्दा उपस्थित करत मतदार यादी स्वच्छ करण्याची मागणी केली, मात्र सत्ताधारी ऐकत नसल्याचे त्यांनी नमूद केले. Maharashtra Breaking News

राज ठाकरे म्हणाले की, “लोक म्हणतात राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते, पण मत मिळत नाही, तर मतं ही अशी चोरली जातात. म्हणून सांगतो मतदार यादी स्वच्छ करा, पण ते ऐकत नाहीत. पाच वर्ष मतदान झाले नाही, अजून एक वर्ष घेऊ नका, पण ते करत नाहीत. तुम्ही कितीही मतदान करा मॅच फिक्स आहे.” त्यांनी क्रिकेटमधील मॅच फिक्सिंगचे उदाहरण देत, निवडून आलेले लोक पाहिजे तसे वागतात, अशी टीका केली.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी महाराजांच्या गडावर ‘नमो टुरिझम सेंटर’ काढण्याच्या बातमीवर आक्षेप घेत राज ठाकरे म्हणाले, “मी आताच सांगतो सत्ता असो नसो वर खाली कुठेही बांधलं की फोडून टाकणार. मुख्यमंत्री पदासाठी एवढी चाटूगिरी सुरु आहे.” ते पुढे म्हणाले की, सत्तेतूनच मतांची चोरी होते, म्हणूनच 1 तारखेचा मोर्चा आहे. महाराष्ट्रातील लोकांचा राग दिल्लीत दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0