Kolhapur Loksabha Election : उद्धव ठाकरे यांनी घेतली छत्रपती शाहू महाराज यांची भेट, विजयाची सभा घेण्यासाठी येणार

Kolhapur Loksabha Election Shahu Maharaj : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली भेटीनंतर उमेदवारी जाहीर
कोल्हापूर :- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन शाहू महाराज द्वितीय यांची भेट घेतली. कोल्हापूरच्या शाहू पॅलेस येथे ही भेट झाली. शाहू महाराज हे कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. ही भेट लोकसभेसंदर्भात असल्याचं सांगण्यात आलं आहे.यावेळी तेजस ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची गळाभेट घेतली. Uddhav Thackeray Meet Shahu Maharaj In Kolhapur



उद्धव ठाकरे म्हणाले, ठाकरे कुटुंबिय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे नाव लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. विजयी मेळाव्याला देखील मी येणार, असा शब्द शाहू महाराजांना दिलेला आहे. मीही शाहू महाराजांच्याकडे काहीतरी मागितलं आहे. त्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांची साथ मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. Uddhav Thackeray Meet Shahu Maharaj In Kolhapur
उद्धव ठाकरे म्हणाले, शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजयी करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. मी फक्त आत्ताच आलोय. मी शाहू महाराजांचा प्रचार करणार आहे. शिवाय त्यांच्या विजयी सभेला देखील येणार आहे. आमच्या विजयासाठी मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 1997 मध्ये इथे आले होते. त्यानंतर मी प्रथमच या ठिकाणी आलो आहे. आम्ही महाराजांना पूर्ण ताकदीने विजयी करणार आहोत. Uddhav Thackeray Meet Shahu Maharaj In Kolhapur