मुंबई

Kiran Mane: शिवसेना नेते आणि अभिनेते किरण माने यांची पोस्ट होत आहे व्हायरल

Kiran Mane Viral Post : शिवसेनेचे नेते अभिनेते किरण माने यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई :- लोकसभेच्या निवडणुकीसाठी Lok Sabha Election 2024 उमेदवारी मिळवण्याकरिता भाजपाचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून राहिल्यामुळे अभिनेते किरण माने Kiran Mane यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.उपमख्यमंत्री अजित पवार या रांगड्या माणसाला अमित शहांपुढे लाचार, हतबल बनून उभं राहिलेले पाहून अतिशय वाईट वाटले. तर सातारकरांचे आदरस्थान उदयनराजे भोसले तीन दिवसांपासून दिल्लीत अमित शहांच्या अपॉईंटमेंटसाठी थांबले आहेत. हा फक्त महाराजांचा नाही तर स्वराज्याच्या राजधानीचा अपमान असल्याचे अभिनेता आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी म्हटले आहे. मराठी माणसांचा अभिमान असणाऱ्या नेत्यांचा अपमान असाच चालू राहिला तर आपल्याला लवकरच जय गुजरात म्हणण्याची वेळ येईल अशी भीती किरण माने यांनी व्यक्त केली आहे. Kiran Mane Viral Post

ठाकरे गटाचे किरण माने यांची पोस्ट व्हायरल

माझं आजोळ बारामती. मी गेली दहाबारा वर्ष अजितदादांना जवळनं बघितलंय, सातार्‍याच्या सर्किट हाऊसमध्ये कलेक्टर-कमिशनरपास्नं पत्रकारांपर्यन्त सगळ्यांवर बिनधास्त डाफरताना बघितलंय. कुणाची पर्वा न करता रूबाबात फिरताना बघितलंय. गुरगुरताना बघितलंय. अशा रांगड्या माणसाला अमित शहापुढं लाचार, हतबल बनून उभं राहिलेलं पाहून सुरूवातीला लै वाईट वाटलं.

…हळूहळू कळलं की दादांचा तो रूबाब होता कारण पाठीशी साहेब होते. आता स्वबळावर झगडायचंय. अभिषेक बच्चनला वडिलांचा वरदहस्त काढून घेऊन एकदम यवतमाळला पाठवून एकांकिकांपास्नं स्ट्रगल करायला लावला तर कसं होईल? त्याला मनोज तिवारीसुद्धा हाडतुड करेल… तसं दादांचं झालंय हे कळलं. दादांविषयी आदर कमी नाही झाला पण त्यापेक्षा कीव जास्त वाटायला लागली.

जसं बारामती आजोळ, तशी माझी मायभूमी सातारा. पक्ष-फिक्ष बाजूला ठेवून आमचं सातारच्या गादीवर प्रेम. आज असं ऐकलं की आम्हा सातारकरांचे आदरस्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तीन दिवस दिल्लीत आहेत…कारण त्यांना अमित शहाची अपाॅईंटमेन्ट मिळत नाही ! आजची भेटही रद्द झाली. उद्याची वेळ मिळालीय. हा फक्त महाराजांचा अपमान नाही, हा स्वराज्याच्या राजधानीचा अपमान आहे. एवढीच इच्छा आहे की महाराजांनी इतरांसारखे या हुकूमशहांचे ‘पपेट’ होऊ नये. वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा.

मराठी माणसाचा अभिमान असणार्‍या नेत्यांना स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळचणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलखासाठी घातक आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्याला लवकरच ‘जय गुजरात’ अशी घोषणा देण्याची सक्ती आल्याशिवाय रहाणार नाही. ही अतिशयोक्ती नाही. आत्ताच मुंबईत हायकोर्टापासून अनेक ठिकाणी गुजराती बोर्ड दिमाखात झळकू लागलेले आहेत.
वेळीच जागे व्हा.

जय महाराष्ट्र !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0