Kalyan Crime News : चोरट्यांचा किराणा मालाच्या दुकानावर डल्ला
•Kalyan Crime News किराणा मालाच्या दुकानात चोरी, पाच लाखावून अधिक किमतीच्या वस्तू चोरीला
कल्याण :- किराणा मालाच्या दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली असून चोरट्याने किराणा मालाच्या दुकानात डल्ला मारत पाच लाखाहून अधिक किंमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर फिर्यादी आणि कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
ई/11 बिल्डींग, गाळा नं. 12 व 13, भुमी वर्ल्ड, पिंपळास, भिवंडी येथे फिर्यादी विराज विकेश शहा, (21 वर्ष), यांचे गाळयाचे मागील शटर कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन त्यावाटे आत प्रवेश करून आतील असा एकुण 5 लाख 26 हजार 827 रुपये किमंतीचा किराणा माल घरफोडी चोरी करून नेला आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि. कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील हे करीत आहे.