मुंबई

Kalaben Delkar : उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का…!! दादरा-नगर हवेलीतून लोकसभेकरिता कलाबेन डेलकर यांना भाजपकडून उमेदवारी

•कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मान्य आभार

मुंबई :- शिवसेनेच्या विद्यमान खासदार कलाबेन डेलकर‌ यांना भाजपाच्या दुसऱ्या यादीत दादरा नगर हवेली या लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर कलाबेन डेलकर या उद्धव ठाकरे गटासोबत राहिल्या होत्या. त्यांच्या रूपाने शिवसेनेला महाराष्ट्र बाहेर पहिल्या महिला खासदार मिळाल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाचे कोणतीही जाहीर माहिती व कार्यक्रम न करता थेट त्यांचे नाव उमेदवाराच्या यादी समाविष्ट करून भाजपाने शिवसेनेला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. Kalaben Delkar

कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे मानले आभार

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानेन की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा पूर्ण प्रयत्न करेन व ही लोकसभा जागा जिंकून त्यांना अर्पण करेन”, अशी प्रतिक्रिया उमेदवारीनंतर कलाबेन डेलकर यांनी दिली आहे. Kalaben Delkar

खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या
मोहन डेलकर यांचे 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथील हॉटेलमध्ये निधन झाले. देऊळकर यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. मोहन देलकर 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते दादरा नगर हवेली व्यतिरिक्त, वापी, दमण, सुरत आणि नवसारी येथेही देलकर कुटुंबाचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत.2021 मध्ये झालेल्या दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. स्थानिक खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरलं होतं. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा-नगर हवेलीमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी भाजपा उमेदवार महेश गावित यांचा तब्बल ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला होता. आता त्याच कलाबेन डेलकर यांचं नाव भाजपाच्या दुसऱ्या यादीत आल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. Kalaben Delkar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0