मुंबई

BJP Loksabha Member List : महाराष्ट्रातील लोकसभेच्या रिंगणात भाजपाच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर

•नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई :- लोकसभेच्या निवडणुकीच्या तारका कधीही जाहीर होऊ शकतात देशात राज्यात कधी आचारसंहिता लागू शकते. भाजपाने लोकसभेच्या उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली या यादीमध्ये महाराष्ट्राच्या 20 जागा जाहीर केल्या असून राज्यातील पहिल्या फळीच्या अनेक नेत्यांना या उमेदवाराच्या यादीत संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी यांच्या उमेदवारीबाबत विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असताना महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीमध्ये नितीन गडकरी यांचे स्थान निश्चित करण्यात आले आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील या केंद्रीय मंत्र्यांना, तर राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही पक्षाने निवडणुकीत उतरवले आहे. त्यांना पक्षाने चंद्रपूरमधून तिकीट दिले. 2019 मध्ये इथे भाजप पराभूत झाला होता. विद्यमान खासदार असलेल्या 4 जागांवरील उमेदवार मात्र गुलदस्त्यातच आहेत. BJP Loksabha Member List

उत्तर मुंबई या सुरक्षित जागेवर मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी. गोपाळ शेट्टींचे तिकिट कापले. उत्तर-पूर्व मुंबई येथून मनोज कोटकांवर नाराजी. इथे गुजरातींचा प्रभाव म्हणून मिहिर कोटेचा या गुजराती नेत्याला संधी. BJP Loksabha Member List

भाजपच्या राज्यातील 20 उमेदवारांची यादी

  • चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
  • रावेर – रक्षा खडसे
  • जालना- रावसाहेब दानवे
  • बीड पंकजा मुंडे
  • पुणे- मुरलीधर मोहोळ
  • सांगली – संजयकाका पाटील
  • माढा- रणजीत निंबाळकर
  • धुळे – सुभाष भामरे
  • उत्तर मुंबई- पियुष गोयल
  • उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
  • नांदेड- प्रतापराव चिखलीकर
  • अहमदनगर- सुजय विखे पाटील
  • लातूर- सुधाकर श्रृंगारे
  • जळगाव- स्मिता वाघ
  • दिंडोरी- भारत पवार
  • भिवंडी- कपिल पाटील
  • वर्धा – रामदास तडस
  • नागपूर- नितीन गडकरी
  • अकोला- अनुप धोत्रे
  • नंदुरबार- डॉ. हिना गावित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0