
पुणे शहराला ९० च्या दशकात सेवानिवृत्तांचे शहर म्हणून ओळखले जात होते. शहराला चौहू बाजूने कॅंटोन्मेंट असल्याने शहराचा विकास मर्यादितच राहणार असे अंदाज बांधले जात, अशा परिस्थितीत शहराचा कायापालट करून बांधकाम क्षेत्राला नावलौकिक मिळवून देणारे बांधकाम क्षेत्रातील महामेरू दीपस्तंभ जयप्रकाश गोयल यांनी पुण्याला नवीन ओळख निर्माण करून दिली. भविष्यकालीन नागरीकरणाचा विचार करून गोयल गंगा बांधकाम समूहाने उपनगरांमध्ये अनेक मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प राबवून पुण्याच्या विकासाला चालना दिली. Jaiprakash Goel
पुणे शहराला आज जगात आयटी हब म्हणून ओळखले जात आहे. वेगाने विकसित होणारे व विस्तारित होणारे शहर म्हणून पुणे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जात आहे यात स्वर्गीय जयप्रकाश गोयल यांचा सिंहाचा वाटा आहे. खराडी, हडपसर, कोंढवा, सिंहगड रोड, बाणेर, औंध, वाकड, विद्यापीठ, कल्याणीनगर, चंदननगर, येरवडा, हिंजेवाडी येथे दर्जेदार बांधकाम प्रकल्प राबवून त्यांनी पुणे शहराच्या विकासात मोलाची साथ दिली. Jaiprakash Goel

जयप्रकाश गोयल यांचे व्हिजन हे विकसित पुण्याचे प्रतिबिंब होते. आधुनिक जगाची सांगड घालत पुणे शहराला आयटी हब म्हणून ओळख निर्माण करण्यात जयप्रकाश गोयल यांनी मोलाची कामगिरी केली. पारदर्शक व्यवहार आणि उत्तम दर्जाचे बांधकाम हे त्यांच्या यशाचे सूत्रे आहेत. दि. १ एप्रिल रोजी जयप्रकाश गोयल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने बांधकाम व्यावसायिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

स्वर्गीय जयप्रकाश गोयल यांच्या दूरदर्शी विकसित पुण्याच्या संकल्पनेला अतुल गोयल पुढे नेत आहेत. बांधकाम प्रकल्प फक्त नफ्यासाठी नव्हे तर ग्राहकांशी स्नेहाचे अतूट नाते निर्माण करण्यासाठी असतात हे गोयल समूहाने दाखवून दिले आहे. Atul Goel
बांधकाम क्षेत्राला नवीन आयाम निर्माण करून देणारे व पुण्याला विकासाची दिशा दाखविणारे स्वर्गीय जयप्रकाश गोयल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
विशेष लेख
मुबारक जिनेरी (संपादक : महाराष्ट्र मिरर)



