Girish Mahajan : उद्धव ठाकरे यांचा पक्ष ‘जमीनदोस्त’ होण्याच्या मार्गावर? संजय राऊतांच्या बडबडींमुळे पक्षाचा अस्तित्वाचा धोक्यात; मंत्री गिरीश महाजन
Girish Mahajan ON Thackeray Group : नाशिकमध्ये भाजपकडे प्रवेशासाठी नेत्यांची गर्दी; शिवसेना ठाकरे पक्षाचे भविष्य धोक्यात ; मंत्री गिरीश महाजन
नाशिक :- महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर संकटांचे ढग घनदाट होत असल्याचे संकेत स्पष्ट होत आहेत. खासदार गिरीश महाजन Girish Mahajan यांच्या मते, पुढील आठ दिवसांत पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न ठरू शकतो. “पक्षात कोण राहणार आणि कोण जाणार हे पुढच्या आठवड्यात स्पष्ट होईल,” अशा सूचक भाष्याने महाजन यांनी राजकीय वर्तुळाला खळबळीत केलं आहे.
संजय राऊत यांनी नुकतीच संघटनात्मक बैठक घेतली असली तरी त्यांचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील चिंताजनक असल्याचे महाजन यांनी म्हटले. “राऊतांच्या बडबडीमुळे हा विषय आता पूर्णपणे आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे,” असा इशारा त्यांनी दिला. “मी पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत,” अशी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सांगितले की, “सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. एका आठवड्यांत तुम्हाला हे चित्र स्पष्ट दिसेल. काही पक्ष नेस्तानाबूत होतील, तर काही मोठे प्रवेश होतील.”
महाजन यांचे हे वक्तव्य स्पष्ट करतं की, आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यांनी पुढे नमूद केलं की, “संजय राऊत यांना फारसं महत्त्व देऊ नका, त्यांचा मुद्दा निवडणुकीनंतरच बघू.”



