मुंबई

Navi Mumbai News : नैसर्गिक नालेसफाई व पावसाळापूर्व कामांची अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व शहर अभियंता श्री.संजय देसाई यांच्याकडून पाहणी

नवी मुंबई :- मे १३ रोजी सायं. ४ नंतर आकस्मिक वादळ व पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नवी मुंबई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत महानगरपालिका Navi Mumbai BMC क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला आणि अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांना नैसर्गिक नालेसफाईच्या कामांची पाहणी करुन त्यांना गती देण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरु असलेल्या नमुंमपा क्षेत्रातील ७७ लहान – मोठया नैसर्गिक नाल्यांची सफाई तसेच अभियांत्रिकी विभागामार्फत सुरु असलेल्या चार मोठया नाल्यांची सफाई यांचा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार आणि शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी आढावा घेतला असता सरासरी ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली असल्याचे निदर्शनास आले. महत्वाचे म्हणजे नाल्यांमधून काढून काठावर ठेवण्यात येणारा गाळ काहीसा सुकल्यानंतर लगेचच तिथून हलवावा व या कामात हलगर्जीपणा करु नये असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
सीबीडी से-१२ येथील पंपहाऊसची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी सुरु असलेली पंपहाऊसची कामे तसेच विदयुत कामे त्वरीत पूर्ण करुन घ्यावीत असे निर्देश देण्यात आले. सायन – पनवेल हायवे खालून हर्डिलिया कंपनी जवळील लक्ष्मीवाडी नजिकचा मोठा नाला साफ करताना हायवेखाली छोटया मशीनचा प्रभावी वापर करुन कामाला गती देण्याचे सूचित करण्यात आले.
से.३ व से.९ सीबीडी बेलापूर येथील नालेसफाईचीही पाहणी करुन सदर कामे गतीमानतेने पूर्ण करावीत असे निर्देशित करण्यात आले. Navi Mumbai Latest News

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिेलेल्या निर्देशानुसार आठही विभागातील नालेसफाई तसेच पावसाळापूर्व कामे अंतिम टप्प्यात असून अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता ही कामे त्वरीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देत आहेत. या पाहणीप्रसंगी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. Inspection of Natural Drainage and Pre-Monsoon Works by Additional Commissioner Mr. Sunil Pawar and City Engineer Mr. Sanjay Desai

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0