क्राईम न्यूजमुंबई
Trending

Bangladeshi Migrants Arrested : नालासोपाऱ्यात तीन बांग्लादेशींना अटक!

Nalasopra Achole Police Arrested Bangladeshi Migrants : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या नालासोपारा पथकाने अनधिकृत वास्तव्य असलेल्या तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच आचोळे पोलिस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हादेखील नोंद करण्यात आला.

नालासोपारा :- नालासोपारा शहरात बांग्लादेशी आणि नायजेरियन नागरिकांचे अनधिकृत वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. या नागरिकांचे धरपकड करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. Nalasopra Achole Police Arrested Bangladeshi Migrants पोलिसांना मिळालेल्या महितीनुसार नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर मधल्या ओम साई अपार्टमेंट, मारुती हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जवळ काही बांग्लादेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याचे समजले.

मिरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या नालासोपारा पथकाचे पोलिस निरीक्षक सौरभी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तीन बांग्लादेशींना अटक केली आहे.अब्बु गफरअली मंडल ( वय 29),कबीर रियाजउद्दीन शेख (वय 60) मिलोन शहानवाज मंडल (वय 37) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आचोळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, पोलीस हवालदार रोशन किणी, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार महेंद्र शेट्ये, अमित चव्हाण,सुनिल पागी, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले सर्व नेम.अनै.मा.या. प्रति. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0