Mulund Fraud Call Center : ‘इंटरनॅशनल लोन’चे आमिष! मुलुंडमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 5 आरोपींना अटक

Mulund Police Busted Fake Call Center :,कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक; लॅपटॉप, मोबाईलसह इतर साहित्य जप्त
मुंबई (मुलुंड) :- आंतरराष्ट्रीय बँकेकडून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका अनधिकृत कॉल सेंटरवर मुलुंड पोलिसांनी Mulund Police मंगळवारी छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांनी या कॉल सेंटरचे संचालन करणाऱ्या पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News
मुलुंड कॉलनी परिसरात काहीजण बनावट कॉल सेंटर चालवत असून, नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली होती. खात्री केल्यानंतर पोलिसांनी एका घरात अनधिकृतरित्या चालवल्या जाणाऱ्या या कॉल सेंटरवर छापा टाकला आणि पाच जणांना ताब्यात घेतले. आरोपी नागरिकांशी फोनवर संपर्क साधून किंवा संदेश पाठवून त्यांना आंतरराष्ट्रीय बँकेकडून कमी दरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. कर्ज घेण्यासाठी कोणी तयार झाल्यास, आरोपी विविध शुल्कापोटी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळत होते. एवढेच नाही तर, कर्ज मंजूर झाल्याची बनावट कागदपत्रेही ते फसवणूक झालेल्या व्यक्तींना पाठवत होते.
पोलिसांनी आरोपींकडून दोन लॅपटॉप, 11 मोबाइल, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले आहे. अशा प्रकारे या आरोपींनी अनेकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करीत आहेत. Mulund Latest Fraud News



