Kalyan Robbery News : डॉक्टरच्या घरात 16 लाखांचे सोने गायब! दोन गृहसेविकांवर चोरीचा संशय

Kalyan Robbery News : कल्याणमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान चोरी; महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू
कल्याण :- कल्याण पश्चिमेकडील मुरबाड रस्त्यावरील एका सोसायटीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला डॉक्टरच्या घरात तब्बल 16 लाख 25 हजार रुपयांच्या सोन्याच्या ऐवजाची चोरी झाली आहे. Kalyan Robbery विशेष म्हणजे, घरात बाहेरील व्यक्तीच्या येण्या-जाण्याची कोणतीही नोंद नसताना ही चोरी झाली असून, डॉक्टरने आपल्या घरात काम करणाऱ्या दोन गृहसेविकांनीच हे कृत्य केले असावे, असा संशय व्यक्त केला आहे. Kalyan Latest Crime News
डॉक्टर सीमा मालणकर यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही चोरी ऑगस्ट 2025 ते 11 नोव्हेंबर 2025 या मोठ्या कालावधीत घडली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार डॉक्टर मालणकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शयनगृहातील कपाटात असलेल्या तिजोरीमध्ये त्यांनी सोन्याचे दागिने ठेवले होते. ऑगस्टपर्यंत हे दागिने तिजोरीत सुरक्षित होते, परंतु त्यानंतर ते अचानक गायब झाले.
घरात कोणतीही चोरी झाली नसताना किंवा बाहेरील कोणीही व्यक्ती घरात आली नसताना केवळ तिजोरीतील सोन्याचे किमती दागिने गायब झाल्याने डॉक्टर मालणकर यांनी घरात काम करणाऱ्या दोन गृहसेविकांवर संशय व्यक्त केला आहे. या दोन गृहसेविकांचा घरात सतत वावर असल्यामुळे त्यांनीच दागिन्यांची चोरी केली असावी, असा संशय त्यांनी पोलीस तक्रारीत व्यक्त केला आहे.
महात्मा फुले पोलिसांनी डॉक्टर मालणकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.



