क्राईम न्यूजमुंबई
Trending

Panvel Police News : नवजात अर्भकाचा परित्याग : पनवेल पोलिसांनी 24 तासांत सोडवला गुन्ह्याचा गुंता

Panvel Police News : विवाहबाह्य संबंधातून झालेलं बाळ अनाथालयाबाहेर टाकलं; आरोपी वडील भिवंडी येथून अटकेत

पनवेल | पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या Panvel Police News हद्दीतील तक्का कॉलनीजवळील मोराज रेसिडेन्सी पार्क येथे एका दोन दिवसांच्या नवजात मुलीला उघड्यावर टाकून दिल्याच्या संवेदनशील प्रकरणाची 24 तासांत उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,28 जून 2025 रोजी रस्त्याच्या कडेला सोडलेल्या अर्भकाबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानवी मूल्यांना हादरवून टाकणाऱ्या या गुन्ह्याचा तपास अत्यंत गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी गुन्हे शाखा कक्ष-2, पनवेल यांना समांतर तपासाचे आदेश दिले.

घटनास्थळी कोणतेही साक्षी किंवा प्रत्यक्षदर्शी नसतानाही पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तांत्रिक तपास केला. आरोपीने वापरलेल्या वाहनाचा मागोवा घेत अमान इकबाल कोंडकर (रा. भिवंडी, ठाणे) याला ओळख पटवून अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने स्वत:च त्या नवजात अर्भकाचा वडील असल्याची कबुली दिली. हे अर्भक त्याच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मले असल्याने त्याने ते तक्का येथील स्वप्नालय मुलींच्या अनाथालयाजवळ सोडल्याचे समोर आले.

आरोपीस पुढील तपासासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे आणि पोलीस शिपाई लवंकुश शिंगाडे व त्यांच्या गुन्हे शाखा पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0