IND vs ENG 5th T20I Score : वानखेडेवर धावांचा पाऊस, टीम इंडियाने इंग्लंडला हरवून रचला विक्रम!

India vs England 5th T20I, Team Indias Records: टीम इंडियाने पाचव्या T20 मध्ये इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम केले.
IND vs ENG 5th T-20 :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 150 धावांनी विजय मिळवत वानखेडे स्टेडियमवर विक्रमांची मालिका रचली.प्रथम फलंदाजी करताना, टीम इंडियाने 247/9 धावा फलकावर लावल्या आणि त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला 10.3 षटकांत 97 धावांत गुंडाळले. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात कोणते विक्रम मोडले आणि प्रस्थापित केले आणि टीम इंडियाचा विजय.
या सामन्यात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने 54 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना अभिषेक शर्माने 1 षटकात 3 धावा देऊन 2 बळी घेतले.
या मालिकेतील पहिला सामना भारताने 7 विकेटने जिंकला होता. यानंतर दुसरा सामना 2 गडी राखून जिंकला. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत 26 धावांनी विजय मिळवला. पण भारताने पुन्हा सलग दोन सामने जिंकले. टीम इंडियाने ही मालिका जिंकली आहे.
टी-20 मालिकेत भारताने इंग्लंडचा 4-1 ने पराभव केला. टीम इंडियाने मुंबईत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यांनी इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने अप्रतिम कामगिरी केली. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.