क्रीडा
Trending

IND vs AUS 1st Test 2024 Day 1 Scorecard : पर्थ कसोटीत भारताचा पहिला डाव 150 धावांवर ऑल आऊट!

IND vs AUS 1st Test 2024 Day 1 Scorecard: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना पर्थमध्ये सुरू आहे. 5 कसोटी मालिकेतील हा पहिला सामना आहे. हा सामना पर्थमधील वाका मैदानावर नसून ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा गतविजेता आहे.

Australia vs India 1st Test Perth :- भारत आणि ऑस्ट्रेलिया IND vs AUS यांच्यातील पहिली कसोटी पर्थमध्ये खेळवली जात आहे. या सामन्याची नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताकडून फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया गेंदबाजाने भारतीय खेळाडूंना 150 धावसंख्यावर रोखले आहे. भारताकडून पुन्हा एकदा सलामी फलंदाजी यशस्वी कामगिरी करू शकले नाही. विराट कोहली रोहित शर्मा यांनी भारतीय प्रेक्षकांना यंदाही नाराज केल्याचे पाहायला मिळाले आहे.ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मिचेल मार्शलाही दोन बळी मिळाले. भारताकडून नवोदित नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या.

प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचे यशस्वी जैस्वाल खातेही उघडू शकली नाही. त्याला मिचेल स्टार्कने बाद केले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला देवदत्त पडिक्कलही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहलीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. तो पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जोश हेजलवूडने विराटला उस्मान ख्वाजाच्या हाती झेलबाद केले.

कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत डावाची सलामी देण्यासाठी आलेला केएल राहुल 74 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल 11 धावा करून आणि वॉशिंग्टन सुंदर चार धावा करून बाद झाला.73 धावांवर 6 विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. पंत 78 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 37 धावा करून बाद झाला.नितीशकुमार रेड्डी एका टोकावर ठामपणे उभे राहिले, पण त्यांना कोणीही साथ दिली नाही.

भारत : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (क), मोहम्मद सिराज/हर्षित राणा.

ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0