क्राईम न्यूज

Mumbai Police News :मुंबईत भाडेकरूंना घर देताना मालकांने पोलिसांना कळविणे बंधनकारक

•पोलीस उप आयुक्त अकबर पठाण‌ यांनी भाडेकरूंसाठी सक्तीचे आदेश

मुंबई :- देशात दहशतवाद्यांची संख्या वाढत असून हे दहशतवादी विविध शहरात नावे बदलून वास्तव्य करत असतात अशातच मुंबईत कोणत्याही घातपात करण्याच्या उद्देशाने एखादे व्यक्ती असे नाव बदलून राहणार असेल तर मुंबई पोलिसांकडून Mumbai Police News सतर्कतेसाठी मालकाला भाडेकरार केल्यानंतर पोलिसांना कळविणे बंधनकारक राहील. हॉटेल,लॉज,घर जागा, गेस्ट हाउस कोणालाही भाड्यांन देणार असाल तर घर मालकाला किंवा जागे मालकाला संपूर्ण माहिती पोलिसांच्या पोर्टलवर देणे बंधनकारक राहील. तसेच परदेशातून एखादा व्यक्ती भाड्यावर येणार असेल तर त्याला पासपोर्ट व्हिजा पोलिसांना देणे बंधनकारक राहील. In Mumbai, it is mandatory for the owners to inform the police while giving houses to tenants

www.mumbaipolice.in. tenant form सिटीजन पोर्टलवर माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच कोणीही नियमाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860, 188 कलम प्रमाणे गुन्हे दाखल करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उप आयुक्त अकबर पठाण‌ यांच्याकडून नोटिस बजावली आहे.10 मार्च‌ ते 8 मे या कालावधी करिता कलम 188 प्रमाणे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0