Ban On These Things Till March 25 In Mumbai : मुंबईत 25 मार्चपर्यंत या गोष्टींवर प्रतिबंध
•पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांचे आदेश
मुंबई :- मुंबईत शांतता व सुव्यवस्था कायम अबाधित राहण्याकरिता तसेच आगामी लोकसभा निवडणुका, राजकीय वातावरण शांतता व सुव्यवस्था, प्रचार, मोर्चे,आंदोलन, यांसारख्या गोष्टीच्या अनुषंगाने 15 दिवसा करिता मुंबई शहरात पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी काही प्रतिबंध घालून देण्यात आले आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच शांतता भंग करणाऱ्या मानवी जीवनात हानी पोहोचवणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहे.पोलीस आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली भागात सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि मानवी जीवनात धोका आणि मालमत्तेचे हानिक आणि कोणत्याही प्रकारचे दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींना हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. Ban On These Things Till March 25 In Mumbai
कशा प्रकारे प्रतिबंधन लागू करण्यात आली आहे
१.पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध.
२. कोणत्याही व्यक्तीची विना परवानगी घेतल्याशिवाय मिरवणूक काढू नये.
३. कोणत्याही मिरवणुकीत लाऊड स्पीकर वाद्य बँड फटाके फोडण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक राहील.
खालील प्रमाणे सूट देण्यात आली आहे
•सर्व प्रकारचे विवाह समारंभ,
•अंत्यसंस्कार, सभा, स्मशानभूमी दफन स्थळाचा मार्गाचा मिरवणूक
•कंपन्या क्लब सहकारी संस्था इतर संस्था संघटनेचे कायदेशीर बैठक
•सामाजिक मेळावे क्लब सहकारी संस्था इतर सोसायटी संघटनांचे सामान्य व्यवहार करण्यासाठी बैठक
•चित्रपट गृह, नाटक गृह सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी त्या भोवती चित्रपट नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने संमेलन
•शैक्षणिक उपक्रमासाठी शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा त्यांच्या संमेलने.
•सरकारी किंवा निम सरकारी कामे पार पाडण्यासाठी सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कायदे न्यायालय व कार्यालयांमध्ये त्या सध्या भोवती लोकांचे संमेलने.
पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी आजपासून (11 मार्च) हे 25 मार्चपर्यंत नियम लागू केले आहे.