नालासोपारा : बांगलादेशी महिलेला अटक
Illegal Bangladeshi Women Arrested In Nalasopra : नालासोपारा येथील न्यू पाटणकर पार्क हाउसिंग सोसायटी येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी केलेल्या धडक कारवाईत एका 37 वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा :- नालासोपारा येथील न्यू पाटणकर पार्क को-ऑप हाऊसिंग सोसायटी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने केलेल्या धडक कारवाईत एका 37 वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. Illegal Bangladeshi Women Arrested In Nalasopra ही महिला गेल्या 17 वर्षापासून भारतात राहत होती, तर त्याआधी ती मुंबईतील विविध भागांत वास्तव्य करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. महिला न्यू पाटणकर पार्क सोसायटीत राहत असल्याचे आम्हाला समजले होते. त्यानंतर या ठिकाणी सापळा रचून तिला ताब्यात घेण्यात आले,’ असे पवार यांनी सांगितले.परदेशी नागरिक कायदा व इतर संबंधित कलमांखाली नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, महेंद्र शेट्ये,अमित चव्हाण, महिला पोलीस शिपाई काजल पाटील, पोलीस हवालदार सुनिल पागी, सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या केली आहे.