महाराष्ट्रमुंबई
Trending

Mumbai BJP News : भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी महाराष्ट्र प्रदेश “सह प्रभारी” राकेश सनस यांची नियुक्ती

Mumbai BJP News : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीचा “सह प्रभारी” राकेश सनस यांना नियुक्ती पत्र प्रदान

मुंबई :- भारतीय जनता पक्षाला विधानसभेत आलेले घवघवीत यश आणि त्यानंतर पक्षाने आता अनेकांना महत्त्वाच्या पदावर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची नवीन राजकीय नीती आखली आहे. Mumbai BJP News राज्यातील विविध मान्यवरांना पक्षांमध्ये सामावून घेऊन नवीन चेहऱ्यांना चांगल्या पदावर संधी देण्याची पक्षाने रणनीती अखली आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता पक्ष संघटने करिता पक्षाने अमुलाग्र बदल केले आहे. भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश “सहप्रभारी” या पदावर समाजसेवक “राकेश सनस” यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश सनस यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

नियुक्तीपत्र प्रदान करताना भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे , चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित, नितीन कोदे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी, यांच्या हस्ते देण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे नेतृत्व करणारे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते यांचे आभार मानत राकेश सनस यांनी पदभार स्वीकारला आहे.

भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे नक्कीच सोनं करेल श्रमिक आणि कामगारांना तसेच असंघटित कामगारांना त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासन दरबारी जाऊन जाब मागील आणि त्यांच्या मागण्या त्यांचे प्रश्न पक्ष आणि पदाच्या माध्यमातून सोडून दिलेल्या पदाला नक्कीच न्याय देईल असे राकेश सनस यांनी म्हणाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0