Kalyan Sex Racket : कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याची धडक कारवाई ; कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
Kalyan Sex Racket Busted By Kalyan Police : वेश्याव्यवसाय प्रकरणी चार दलालांना अटक झाली असून त्यात तीन महिला आहेत.महात्मा फुले पोलिसांनी रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करून 13 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
कल्याण :– महात्मा फुले पोलिसांनी Mahatma Phule Police कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला आहे. या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी वेश्या व्यवसायाला भाग पाडणाऱ्या 4 दलालांना अटक केली आहे. Kalyan Sex Racket Busted By Kalyan Police विशेष म्हणजे या 4 दलालांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी आता महात्मा फुले पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी आता कल्याण रेल्वे स्टेशनवरील असे प्रकार थांबतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कल्याणच्या स्कायवॉकवर त्यांना वावर दिसतो. विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशनवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांचादेखील मोठा समावेश असतो. पण कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला रस्त्यावर उभ्या राहिल्याने सर्वसामान्य महिलांना रात्रीच्या सुमारास ये-जा करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांनी या गोष्टींची दखल घेत तिथे छापा टाकला. पोलिसांना या कारवाईत मोठे यश आले. पोलिसांनी एकूण 13 महिलांची यातून सुटका केली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पोलीस पथकाटे कल्याण रेल्वे स्थानक, भिवंडी बस स्टॉप, या ठिकाणी कारवाई करत ती महिला दलाल अनेक पुरुषाला अटक केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143 (3), 3(5), सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच 13 पिडीत महिलांना सुरक्षिततेकामी महिला सुधारगृह, उल्हासनगर 05 येथे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस पथक
अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, कल्याणजी घेटे, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी केली आहे.