Zp School : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 मिनट पठन

ZP School : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचा निर्णय
पुणे, महाराष्ट्र मिरर
Zp School : विधानसभा मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. आगामी १३ ते ३० जुलै या कालावधीत सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील यांनी दिले आहेत. ( zp school primary morning shift )

शिक्षकांवर असलेली 'बीएलओ'ची (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) जबाबदारी आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातील शाळांच्या वेळेतही हा तात्पुरता बदल लागू होणार आहे. ( ZP School )
Sunetra Pawar : ढिगाऱ्याखाली आणखी ६ मृतदेह असण्याची भीती; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती
प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन परिपत्रकानुसार, सोमवार ते शुक्रवार शाळांची वेळ सकाळी ७.०० ते दुपारी १२.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी ७.०० वाजता शाळा सुरू होऊन स्वच्छता व परिपाठ घेतला जाईल, तर दुपारी १२.३० वाजता नियमित तासिकेनंतर शाळा सुटणार आहे. शनिवारी मात्र शाळा नेहमीच्या ठरलेल्या वेळेनुसारच भरवली जाईल, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (School )
शिक्षकांसाठी काढला 'सुवर्णमध्य'
राज्यात सध्या मतदार याद्या दोषविरहित आणि अचूक करण्यासाठी विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या राष्ट्रीय कामासाठी पुणे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांची 'बीएलओ' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांना अध्यापनाचे कर्तव्य बजावून मतदार यादीचे कामही प्रभावीपणे पार पाडता यावे, यासाठी प्रशासनाने हा सुवर्णमध्य काढला आहे. सकाळच्या सत्रात शाळा आटोपल्यानंतर शिक्षकांना दुपारी बीएलओच्या कामासाठी पूर्ण वेळ देता येणार आहे.
Pune News : अधिकारी गेले अन् काही तासांतच पुन्हा सांडपाणी रस्त्यावर
कामचुकारपणा केल्यास थेट कारवाई
"ज्या शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती झालेली नाही, त्यांनी इतर सहकाऱ्यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय कामात मदत करावी. शाळाप्रमुखांनी अंतर्गत कामाचे नियोजन अशा पद्धतीने करावे, जेणेकरून बीएलओ शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडणार नाही," असे स्पष्ट निर्देश सीईओ गजानन पाटील यांनी दिले आहेत. ( ZP School )
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
या आदेशाची कडक अंमलबजावणी करून सर्व शाळांना केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल विहित नमुन्यात आणि दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषदेकडे सादर करावा लागणार आहे. यात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (School )
