Teerth Spaces : 'तीर्थ स्पेसेस'च्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न
Teerth spaces : मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे 'तीर्थ स्पेसेस युनिट ४ एलएलपी' या नामांकित कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर ५० हून अधिक जणांच्या जमावाने जेसीबी आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे.
2 मिनट पठन

Teerth Spaces : न्यायालयाच्या 'जैसे थे' आदेशाला पोलिसांचे मौन, आयुक्तांकडे कठोर हस्तक्षेपाची मागणी!
Teerth spaces : मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे 'तीर्थ स्पेसेस युनिट ४ एलएलपी' या नामांकित कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर ५० हून अधिक जणांच्या जमावाने जेसीबी आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी बावधान पोलीस ठाण्यात अर्ज देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा (FIR) दाखल न केल्यामुळे 'तीर्थ रिअल्टीज'चे डेसिग्नेटेड पार्टनर विजय तुकाराम रौंदळ यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याकडे तातडीने कठोर हस्तक्षेपाची औपचारिक मागणी केली आहे. Teerth spaces land attack fir mahalunge

कंपनीचे सिद्धार्थ रमेश कोठारी यांनी २७ जुलै २०२६ रोजी बावधान पोलीस ठाण्यात सविस्तर लिखित तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत अरुण वेणूनाथ खऱ्हाडे पाटील, प्रसाद अरुण खऱ्हाडे पाटील आणि सुमारे ५० अज्ञात व्यक्तींनी महाळुंगे येथील सर्व्हे क्र. ९/१० व लगतच्या जमिनीवर बेकायदेशीर प्रवेश केला. सोबत आणलेल्या जेसीबीच्या साह्याने आणि लोखंडी रॉडने कंपनीचा मुख्य 'तीर्थ रिअल्टीज'चा सही बोर्ड, सुरक्षेसाठी लावलेले ३० सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपूर्ण सर्व्हिसिंग सिस्टीम उद्ध्वस्त केली. Teerth spaces
Amit Shah : तुमचं ते लेकरू आमचं ते कार्ट.. शहांच्या दौऱ्यावरुन रणकंदन
२५ फूट उंच लोखंडी कुंपण आणि भिंतीचे कंपाउंड जमिनीवर पाडण्यात आले.जागेवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर निर्घृण हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. ऑफिसच्या केबिनमध्ये बळजबरीने घुसून अकाउंट्स रूममधील २५ हजार रुपयांची रोकड चोरण्यात आली (दरोडा) आणि मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा कायम ठेवण्यात आला. असे आरोप कोठारी यांनी केले आहेत. Teerth spaces

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे येथील १४ वे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या स्पेशल सिव्हिल सूट क्र. ९४२/२०२६ अंतर्गत दिनांक २७ जुलै २०२६ रोजी अत्यंत महत्त्वाचा आदेश पारित करण्यात आला आहे. "प्रथमदर्शनी असे दिसून येते की प्रतिवादी क्रमांक १९ हा वादग्रस्त मालमत्तेवर फिर्यादीच्या ताब्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे वादग्रस्त मालमत्तेबाबत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देणे योग्य राहील. न्यायालयाच्या या स्पष्ट आदेशामुळे हा केवळ दिवाणी स्वरूपाचा वाद नसून सरळ सरळ बळजबरी, हिंसाचार आणि गुन्हेगारी कृत्य असल्याचा मुद्दा प्रस्थापित झाला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
न्यायालयाचे आदेश, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, जखमी कर्मचारी, सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने (जेसीबी क्र. MH-12-XQ-8336 आणि पांढरी एसयूव्ही क्र. MH-12-XQ-7574) यांचे पुरावे उपलब्ध असतानाही बावधान पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत संज्ञेय गुन्ह्यांची नोंद करण्यास टाळाटाळ केली असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. Teerth spaces
PMC : ‘पुष्पा’ फेम वृक्ष अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; ५ लाखांची लाचखोरी अन्

बावधान पोलिसांच्या भूमिकेविरोधात पोलीस आयुक्तांकडे धाव
दरम्यान, फिर्यादीने बावधान पोलिसांच्या भूमिकेविरोधात पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. बावधान पोलीस ठाण्याला २७ जुलै २०२६ च्या अर्जावरून तातडीने एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश द्यावेत. घटनास्थळी तातडीने पोलीस फौजफाटा पाठवून सुरू असलेली बेकायदेशीर तोडफोड व ताबा पूर्णपणे थांबवावा.
गुन्ह्यात वापरलेला जेसीबी आणि पांढरी एसयूव्ही गाडी तात्काळ जप्त करून घटनास्थळाचे व पुराव्यांचे रक्षण करावे. सर्व जखमी सुरक्षा रक्षक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब विनाविलंब नोंदवून घेण्यात यावेत. न्यायालयाच्या 'जैसे थे' आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बावधान पोलीस ठाण्याच्या संबंधितांवर कारवाई करून तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा. अशी मागणी करण्यात पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

