मुख्य सामग्री पर जाएँ

Samna Article : जिथे भाजपची सत्ता आहे…', शिवसेनेच्या यूबीटीने बदलापूर प्रकरणावर संताप व्यक्त केला.

Samna Article On Badlapur School Case : बदलापूरमधील लैंगिक छळ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 'सामना'मधून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

व
विवेक

1 मिनट पठन

Badlapur School Case

Samna Article On Badlapur School Case : बदलापूरमधील लैंगिक छळ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 'सामना'मधून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई :- बदलापूर येथील शाळेत Badlapur School Case दोन निष्पाप मुलांचा लैंगिक छळ झाल्याच्या प्रकरणाबाबत ठिकठिकाणी लोकांचा निषेध करण्यात येत आहे. या घटनेबाबत उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातून शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जशास तसा

लाडक्या लेकींचा उद्रेक !

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याने वातावरण पेटले आहे. संतप्त पालक आणि जनता रस्त्यावर उतरली. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. प्रश्न संतप्त जनतेचा नाही, तर लोक रस्त्यावर उतरल्यानंतर 'अॅक्शन मोड'मध्ये येणाऱ्या राज्यकर्त्यांचा आहे. या घटनेने मानवी विकृती आणि अमानुषतेचा क्रूर चेहरा तर समोर आलाच, परंतु त्याचबरोबर राज्यकर्त्यांचा स्त्रीदाक्षिण्याचा मुखवटाही टराटरा फाडला. 'लाडकी बहीण' योजनेचे श्रेय ही मंडळी उठताबसता घेत आहे. हे सरकार भगिनींना पैसे तर देत आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेचे काय? ती कधी देणार? तुमच्या राज्यातील तीन-चार वर्षांच्या चिमुरड्याही सुरक्षित नसतील, नराधमांच्या विकृतीच्या बळी ठरत असतील तर 'भावा'च्या नात्याचे ढोल पिटण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे ढोल नसून ढोंग आहे. बदलापूरच्या संतापजनक घटनेने आणि पोलिसी निष्क्रियतेने हे ढोल फोडले आहेत. ना तुम्ही बहिणींचे रक्षण करू शकत आहात ना सत्तेचा, कायद्याचा वचक राज्यात राहिला आहे. बदलापूर प्रकरणातही ते दिसलेच. अत्याचारग्रस्त चिमुरड्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात 11-12 तास रखडवून ठेवण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तब्बल 12 तासांनंतर सुरू केली गेली. हा विलंब कशासाठी करण्यात आला? कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला गेला? ज्या शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे. मग येथेही 'निबंध' लिहून घेऊन कोणाला सोडून देण्याचा विचार होता का? त्यासाठी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला गेला का? आता गृहमंत्री फडणवीस म्हणत आहेत की, दिरंगाई झाली असेल तर कारवाई करू. पालकांना बसवून ठेवलं असेल तर कारवाई करू. तक्रार नोंदवण्यास 12 तास हा विलंब नाही तर काय आहे? तरीही गृहमंत्रीच जर आणि तरची भाषा करीत आहेत. ती दिरंगाई करणाऱ्यांच्याच पथ्यावर पडणारी आहे. पुण्यातील पोर्शे हिट अॅण्ड रन प्रकरणातही पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणांकडून असाच गुन्हेगारी स्वरूपाचा वेळकाढूपणा करण्यात आला होता. नंतर तीव्र पडसाद उमटल्यावर राज्यकर्त्यांना 'ॲक्शन मोड'वर येणे भाग पडले होते. पुन्हा तुम्ही काही करायचे नाही आणि विरोधकांनी त्यासाठी भाग पाडले तर विरोधक राजकारण करतात म्हणून गळे काढायचे. आता बदलापूरप्रकरणीही विरोधकांनी राजकारण करू नये, असे श्रीमान फडणवीस म्हणाले. मुळात तुमच्या अखत्यारीतील …

हेही वाचा: Panvel Marathon News : रायगडातील पहिली पूर्ण मॅरेथाॅन 1 डिसेंबर ला पनवेलमध्येमहानगरांचे वैभव जसं पनवेलला येतंय तशा समस्या देखील येतील;आ.प्रशांत ठाकूर यांची सतर्कतेची जाणीव

शेयर करें