Rain Update: खडकवासला धरणसाखळीत ८७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; मुठा नदीतील विसर्ग बंद
पुणे, महाराष्ट्र मिरर
1 मिनट पठन

Rain Update: टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला खोऱ्यात पावसाची विश्रांती
पुणे, महाराष्ट्र मिरर

Rain Update: पानशेत-मुठा-मोसे खोऱ्यासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर रविवारी दुपारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक शनिवारपेक्षा (दि. २५) कमी झाली आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणसाखळीत २५.५४ टीएमसी म्हणजेच ८७.६३ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला. दरम्यान, पाण्याची आवक मंदावल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत केला जाणारा विसर्ग रात्री ११ वाजता पूर्णपणे थांबविण्यात आला. Rain Update pune khadakwasla dam
मागील पाच दिवस पडलेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत धरणसाखळीत जवळपास एक टीएमसीची भर पडली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत २४.५६ टीएमसी साठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत ०.७० टीएमसी अधिक साठा आहे. गेल्या वर्षी २६ जुलै रोजी धरणसाखळीत २४.८४ टीएमसी (८५.२० टक्के) पाणी होते.

Robbery Case: १ कोटींच्या दरोडा प्रकरणात पत्रकार आशिष तिवारी अटकेत
क्षेत्रनिहाय पाऊस
टेमघर: ३६ मिमी
पानशेत: ९ मिमी
वरसगाव: ५ मिमी
खडकवासला: ५ मिमी
वरसगाव धरणच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण-मारके म्हणाल्या की, "गेले पाच दिवस पडलेला जोरदार पाऊस आणि सध्याच्या रिमझिमीमुळे ओढे-नद्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. मात्र, जोरदार पाऊस नसल्याने धरणांमधील पाण्याची आवक मंदावली आहे." Rain Update
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग दुपारनंतर टप्प्याटप्प्याने कमी करून रात्री पूर्णपणे थांबविण्यात आला. असे असले, तरी खडकवासला धरण शंभर टक्के भरले असल्याने धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास जादा पाणी मुठा नदीत सोडावे लागणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Pune Metro 3 : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा सिग्नल; माण ते बालेवाडी मार्गावर प्रवासी सेवा लवकरच
सध्या घाटमाथ्यासह चारही धरणक्षेत्रांत पावसाचा जोर ओसरला असून केवळ रिमझिम पाऊस आणि अधूनमधून सरी कोसळत आहेत. यादरम्यान पावसाचे ढग विरळ होऊन थोड्या वेळासाठी सूर्यदर्शन होत असल्यामुळे, धरण खोऱ्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्यांची खोळंबलेली शेतीची कामे पुन्हा सुरू करण्यास अनुकूल वातावरण मिळाले आहे.Rain Update

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
