मुख्य सामग्री पर जाएँ

Pune : शहरात डेंग्यूचा वेगाने प्रादुर्भाव; दीड महिन्यात ३०० संशयित रुग्ण आढळले

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

pune

Pune : वारजे-कर्वेनगर (४६ रुग्ण) हा भाग संशयित रुग्णांच्या बाबतीत शहरात आघाडीवर आहे.

पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune : पावसाने जोर धरताच शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले असून, महापालिकेच्या आकडेवारीतून याचा प्रादुर्भाव वेगाने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अवघ्या दीड महिन्यात शहरात ३०० संशयित डेंग्यूरुग्णांची नोंद झाली आहे. चालू वर्षात १ जानेवारी ते १५ जुलै २०२६ या कालावधीत एकूण ४७३ संशयित डेंग्यूरुग्ण आढळले आहेत. सुरुवातीच्या महिन्यांत रुग्णवाढीचा वेग मंदावलेला असला, तरी पावसाळ्याच्या आगमनानंतर जून आणि जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. pune dengue case rise monsoon 2026

दीड महिन्यात ३०० रुग्णांची भर
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव किती वेगाने वाढतोय, याची प्रचिती महापालिकेच्या ताज्या आकडेवारीवरून येते. १ जानेवारी ते १५ जुलै २०२६ या अवघ्या साडेसहा महिन्यांच्या काळात पुण्यात ४७३ संशयित डेंग्यूरुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यातील तब्बल ३०० रुग्ण हे अवघ्या दीड महिन्यात (जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात) समोर आले आहेत. pune

Pune Police: जखमी तक्रारदारांना आता स्वतः रुग्णालयात नेणार पोलीस

वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात २५, फेब्रुवारीत २३, मार्चमध्ये २६, तर एप्रिलमध्ये ४१ संशयित रुग्ण आढळले होते. मे महिन्यात हा आकडा थोडा वाढून ५८ वर पोहोचला. मात्र, पावसाळ्याच्या आगमनासोबतच जून महिन्यात डेंग्यूच्या संशयितांचा ग्राफ एकदम उंचावला आणि हा आकडा थेट १७५ वर जाऊन पोहोचला. जुलै महिना तर अजून अर्धाच संपला आहे, तरीही पहिल्या पंधरवड्यातच १२५ नवीन संशयित रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, हा वाढीचा वेग असाच राहिल्यास आगामी काळात डेंग्यूचा फैलाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

कुठल्या भागात सर्वाधिक धोका?
महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभागनिहाय आकडेवारीनुसार, शहराच्या विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वेगवेगळे आहे. काही परिसर या आजाराचे मोठे हॉटस्पॉट बनताना दिसत आहेत. वारजे-कर्वेनगर (४६ रुग्ण) हा भाग संशयित रुग्णांच्या बाबतीत शहरात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कोथरूड (४५), नगर रोड-वडगावशेरी (४४), औंध-बाणेर (४३) आणि धनकवडी-सहकारनगर (४२) या भागांतही डेंग्यूचा प्रभाव अत्यंत चिंताजनक स्तरावर पोहोचला आहे.

कोंढवा-येवलेवाडी (३२), कसबा-विश्रामबागवाडा (३०) आणि येरवडा-कळस-धानोरी (२८) या दाट वस्तीच्या भागांतही डेंग्यूचे सावट घोंगावत आहे. तुलनेने बिबवेवाडी (११) आणि केशवनगर (८) या भागांत मात्र संशयित रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात असल्याचे दिसते. pune

साचणारे पाणी आणि डासांची पैदास
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहणे, हे डेंग्यूच्या वाढत्या संसर्गाचे मूळ कारण आहे. रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी, जुनी टायर, डबे, नारळाच्या करवंट्या, तसेच घरांच्या छतावर किंवा कुलरमध्ये साचून राहिलेले पाणी डेंग्यूच्या 'एडिस इजिप्टाय' डासांसाठी उत्तम उत्पत्ती स्थान ठरते. या साचलेल्या पाण्यातून झपाट्याने वाढणारी डासांची संख्या आणि बदलणारे हवामान नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. pune

PMC: मंजूर १३ पैकी ८ पदे रिक्त; पुण्याच्या शासकीय बालरुग्णालयांची अवस्था रामभरोसे

काय काळजी घ्यावी? (आरोग्य विभागाचा सल्ला)
डेंग्यूच्या या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभागाने खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे:

परिसर स्वच्छता: घराभोवती पाणी साचू देऊ नका. डबे, टायर किंवा कुंड्यांमध्ये पाणी साचत असल्यास ते वेळच्या वेळी रिकामे करा.

डासांपासून संरक्षण: घरामध्ये मच्छरदाणीचा वापर करा, अंगावर पूर्ण कपडे घाला आणि डास प्रतिबंधक क्रिम किंवा ऑइलचा वापर करा.

वेळेवर वैद्यकीय तपासणी: जर अंगात सतत ताप राहणे, तीव्र अंगदुखी, डोळ्यांच्या मागच्या भागात वेदना होणे किंवा प्रचंड अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेयर करें