pune crime : करडे गोळीबार प्रकरणाचा ७२ तासांत उलगडा; पाच संशयितांना जेरबंद केले
pune crime -करडे गोळीबार प्रकरणाचा ७२ तासांत छडा; पाच संशयित जेरबंद
2 मिनट पठन

pune crime : शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई; परजिल्ह्यातून आरोपी ताब्यात
pune crime : शिरूर तालुक्यातील करडे गावात सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाचा शिरूर पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत छडा लावला आहे. शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि नियोजनबद्ध कारवाईच्या माध्यमातून परजिल्ह्यातून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शिरूर पोलिसांच्या तपास कौशल्याचे आणि तत्परतेचे कौतुक होत आहे.(pune crime)

१८ जुलै रोजी मध्यरात्री करडे गावातील हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळील तळ्याच्या परिसरात ही घटना घडली होती. जुन्या वादातून निखिल सतीश थेउरकर याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत विशेष पथके तयार केली.(pune crime)
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीदारांच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. सातत्यपूर्ण तपासानंतर आरोपींच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली.
EDUCATION : सिंहगड इन्स्टिट्यूट नऱ्हे कॅम्पसमध्ये, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना आरोपी सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथील बसस्थानक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार डीबी पथकाने नियोजन करून त्या ठिकाणी सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने पाच संशयितांना ताब्यात घेतले.(pune crime)

या कारवाईत अथर्व उर्फ टिन्या शेळके, रोहन उर्फ दादया पंचमुख, आदित्य लंघे, निखिल कायस्थ आणि सनी मस्के यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
Crime News : १७ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणातील आरोपींची पावसात धिंड
पोलिसांच्या माहितीनुसार, अथर्व शेळके आणि रोहन पंचमुख हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने करण्यात येत आहे.(pune crime)
दरम्यान, प्राथमिक तपासात या गोळीबारामागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी निखिल थेउरकर याच्याकडून यापूर्वी आरोपींना झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.(pune crime)
पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह राकेश मुळीक, अक्षय कळमकर, शरद वारे, राहुल भवर, विजय शिंदे, नितेश थोरात, नीरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
करडे गोळीबार प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत उलगडा करून आरोपींना अटक केल्याने शिरूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या कारवाईतून गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
