मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime: आंदेकर टोळीतील गुंडांचा एसटी बॉईज टोळीकडून पाठलाग; कोर्टातून बाहेर पडल्यानंतर तणाव

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

Pune Crime

Pune Crime : पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाची चाहूल; आंदेकर टोळीवर हल्ल्याचा कट उधळला

पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune Crime : पुणे शहरात पुन्हा एकदा दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाच्या संघर्षाने डोके वर काढले असून, आंदेकर टोळीतील सदस्यांवर न्यायालयीन कामकाजावरून परतताना हल्ला करण्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सूरज ठोंबरेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे. Pune Crime Andekar Gang Police

प्राथमिक माहितीनुसार, आंदेकर टोळीतील काही आरोपींना न्यायालयीन सुनावणीसाठी नंदूरबार कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्यासाठी पोलीस वाहन रवाना झाले असताना, प्रतिस्पर्धी एसटी बॉईज अर्थात सोमनाथ गायकवाड टोळीशी संबंधित सदस्यांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत पाठलाग केल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

MS-CET : बोगस गुण, लाखांचे ‘पॅकेज’ अन्… ; शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा!

या प्रकरणात सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले (वय २४), वेदांत रोहित सावंत (वय २१), धीरज लखारा आणि अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१) यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. pune crime

आंदेकर, नातू स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर हे सध्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाईनंतर नंदूरबार कारागृहात आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते. याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

गुन्हे शाखेच्या तपासात सूरज ठोंबरेने आपल्या साथीदारांच्या मदतीने शिवाजीनगर ते चाकण या मार्गाची पाहणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस वाहनावर हल्ला करून आंदेकर व वाडेकर यांचा खून करण्याचा त्यांचा मानस होता. या कटासाठी आरोपींना पिस्तूलही पुरविण्यात आल्याची बाब तपासात उघड झाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने वेळीच कारवाई करून संभाव्य रक्तपात टाळल्याचे पोलिसांनी सांगितले.

RMC : पुण्यात वीकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेश; कॅमेरा, मद्यतपासणीसह कडक सुरक्षा नियम

पुण्यातील आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळ्यांमधील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप सोमनाथ गायकवाड टोळीतील सराईत गुन्हेगारांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्या झाल्या. तसेच दोन महिन्यांपूर्वी पुणे–सातारा रस्त्यावर अक्षय काळे याच्यावर गोळीबाराची घटना घडली होती. या सलग घटनांमुळे दोन्ही टोळ्यांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या प्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयीन बंदोबस्तात असलेल्या आरोपींवर हल्ल्याचा कट रचला जाणे ही गंभीर बाब मानली जात असून, पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. या कटामागील नेमका सूत्रधार, त्यात सहभागी असलेले इतर आरोपी तसेच शस्त्रपुरवठ्याचे जाळे उघड करण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू आहे. pune crime

PMC : पुणेकरांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; जाणून घ्या कोणत्या भागात येणार नाही पाणी

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे आणि त्यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. शहरातील टोळीवादावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना राबविण्यात येत असून, गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. pune crime

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेयर करें