मुख्य सामग्री पर जाएँ

PMC : छत्रपती शिवाजीनगर परिसरातील सुमारे तीन हजार घरांना गढूळ पाण्याचा पुरवठा

PMC- सुमारे तीन हजार घरांना गढूळ पाण्याचा पुरवठा

पक
प्रतीक्षा काटे

2 मिनट पठन

PMC

PMC : पाटील इस्टेट, संगमवाडी, येरवडा भागातील नागरिक त्रस्त; आरोग्याचा प्रश्न गंभीर, मनसेची महापालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी

PMC : स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नळातून येणारे पाणी पिवळसर आणि गढूळ असल्याने ते थेट पिण्यास किंवा स्वयंपाकासाठी वापरणे धोकादायक ठरत आहे. अनेक नागरिकांना पाणी गाळून किंवा उकळून वापरावे लागत आहे. काही कुटुंबांना पर्याय नसल्याने बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत असून त्याचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे राहतात. दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना संसर्गजन्य व जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. अनेक नागरिकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि ताप यांसारख्या तक्रारींमुळे वारंवार दवाखान्यात जावे लागत असल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे उपचाराचा खर्च वाढून कुटुंबांच्या आर्थिक अडचणीत भर पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. PMC

EDUCATION :राज्यातील सहा अनुदानित वसतिगृहे केवळ कागदोपत्री; कॅगचा धक्कादायक अहवाल

या पार्श्वभूमीवर मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने चतुःश्रृंगी पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात संबंधित भागातील पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून गढूळ पाण्याचे कारण शोधावे, दूषित पाण्याचा पुरवठा त्वरित थांबवावा आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच पाणीपुरवठा वाहिन्यांमध्ये गळती, ड्रेनेजचे पाणी मिसळणे किंवा अन्य तांत्रिक बिघाड असल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.PMC

Pune Election : पुणे विभागातील ६४ उमेदवार पुढील ३ वर्षांसाठी अपात्र; विभागीय आयुक्तांची मोठी कारवाई

मनसेच्या शिष्टमंडळात अँथोनी आढाव, मिलन भोरडे, गोकुळ अडागळे, लक्ष्मण चव्हाण, सज्जन नरवडे, रमेश साठे, योगेश शिंदे, सलीम शेख, वेदांत शिंदे, विजय बेल्हेकर, किशोर इंगवले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र स्थानिक नागरिकांनी गढूळ पाण्याच्या पुरवठ्याची तक्रार वारंवार करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.PMC

Pune News : सदोष पालिका कामांवर सुनील टिंगरे यांचा हल्लाबोल

दाट लोकवस्तीच्या या भागात सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी असल्याचे सांगत, प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची तपासणी करून दूषित पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि मनसेकडून करण्यात आली आहे.PMC

View this post on Instagram A post shared by civicmirror (@civicmirrorpune)

शेयर करें