मुख्य सामग्री पर जाएँ

PMC : पुणे महापालिकेच्या नव्या झाडणकाम योजनेवरून वाद पेटला!

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

PMC
ai generated photo

PMC : नगरसेवकांकडून ३०-४० जणांच्या याद्या; थेट जबाबदारी अन् दंडाच्या भीतीमुळे ठेकेदारांची नकारघंटा

पुणे, महाराष्ट्र मिरर

PMC : पुणे महापालिकेच्या रस्ते झाडणकामाच्या नव्या सुधारित व्यवस्थेची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. मात्र, या व्यवस्थेला राजकारणाचा फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेच्या या नव्या भरतीचा फायदा घेत आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना कामावर घेण्यासाठी अनेक नगरसेवकांनी ठेकेदारांवर जोरदार राजकीय दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, नव्या नियमांनुसार स्वच्छतेची थेट जबाबदारी आणि त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाईची टांगती तलवार स्वतःवरच असल्याने, "वशिल्याने आलेली माणसे काम करत नाहीत" या अनुभवातून ठेकेदारांनी नगरसेवकांच्या या दबावाला ठाम नकार दिला आहे. pmc cleaning contractors corporator

कामाची नवी पद्धत अन् दंडात्मक कारवाई

ठेकेदारांनी केवळ कागदोपत्री काम दाखवून प्रत्यक्ष रस्त्यावर झाडणकाम न केल्याच्या तक्रारी महापालिकेकडे सतत येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने झाडणकामाच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे. महापालिका प्रशासनाने नियमावलीत मोठा बदल केला आहे.

अखेर Mukunddas Lohiya College वर AICTE ची कारवाई

नव्या धोरणानुसार, ठेकेदाराला नेमून दिलेला परिसर, रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागेल. कामात निष्काळजीपणा किंवा त्रुटी आढळल्यास प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारावर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. केवळ कामगार पुरवण्याची जबाबदारी ठेकेदारांची राहणार नसून, नेमून दिलेला परिसर, रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची थेट जबाबदारी त्यांचीच असेल. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद प्रशासनाने केली आहे.

या नव्या धोरणासाठी महापालिकेने झाडणकामाचे मनुष्यबळ जवळपास दुप्पट केले आहे. यापूर्वी शहरात ४ हजार ८१६ कर्मचारी या कामासाठी कार्यरत होते, त्यात आता आणखी ४ हजार ७०९ कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण ९ हजार ५२३ कर्मचारी शहरातील रस्त्यांवर झाडणकाम करणार असून, यामुळे शहरातील स्वच्छतेत मोठी सुधारणा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. PMC

नगरसेवकांचा तगादा आणि ठेकेदारांची कोंडी

झाडणकामासाठी सुमारे ४,७०० हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची भरती होत असल्याचे समजताच सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांतील काही नगरसेवकांनी ठेकेदारांकडे धाव घेतली. काही नगरसेवकांनी थेट ३० ते ४० जणांची भलीमोठी यादीच ठेकेदारांच्या हातात टेकवली, तर काहींनी स्वतःच्या वैयक्तिक व घरगुती कामांसाठी दोन-तीन कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

PMC : ‘पुष्पा’ फेम वृक्ष अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; ५ लाखांची लाचखोरी अन्

मात्र, वशिल्याने आलेल्या व्यक्ती प्रत्यक्ष रस्त्यावर काम करत नाहीत. आता महापालिकेने थेट कामाच्या दर्जावर दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दंड आम्ही का भरायचा? या भावना व्यक्त करत ठेकेदारांनी नगरसेवकांच्या दबावाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. PMC

महापौरांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक

या नव्या व्यवस्थेमुळे निर्माण झालेला तणाव आणि नगरसेवकांचे आक्षेप मिटवण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांनी तातडीची संयुक्त बैठक बोलावली.
या बैठकीला सभागृहनेते गणेश बीडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. नवी झाडणकाम व्यवस्था सुरळीत लागू व्हावी आणि नगरसेवकांच्या रास्त तक्रारींचे निवारण व्हावे, यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन या वेळी महापौर व आयुक्तांनी दिले.

PMC News : स्वच्छता स्पर्धेत विजेत्या क्षेत्रीय कार्यालयांना मिळणार ९० लाखांचे बक्षिस

https://www.instagram.com/reel/DbfXrF7omZG/?igsh=MXZtMjM2ZTF6OXJuNw==

शेयर करें