भरधाव कारच्या धडकेत पादचार्याचा मृत्यू
पुणे-मुंबई महामार्ग ओलांडताना घडली घटना
पघ
प्रशिक घस्ते
1 मिनट पठन

पुणे-मुंबई महामार्ग ओलांडताना घडली घटना
पुणे-मुंबई महामार्ग ओलांडणार्या पादचार्याला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील बगीचा हॉटेलसमोर घडली.

रामबाबू चनेश्वर राम (वय ३६) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्याचे नाव आहे. कार चालक सोमेश्वर रंगनाथ काळे (वय ३४, रा. जांभूळ, ता. मावळ) याला अटक केली आहे. आरोपी सोमेश्वर काळे हा आपली वॅगनार कार घेऊन भरधाव जात होता.
रस्ता ओलांडणारे रामबाबू यांना कारने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात रामबाबू यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Pedestrian dies after being hit by speeding car
