PCMC : पालिकेत ४०० कोटींचा शालेय साहित्य खरेदी घोटाळा
पिंपरी, महाराष्ट्र मिरर
2 मिनट पठन

PCMC : ई-निविदा न काढता सोलापूरच्या संस्थेला काम; मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्याने दबाव आणल्याचा खासदारांचा खळबळजनक आरोप
पिंपरी, महाराष्ट्र मिरर
PCMC : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ( pcmc ) प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उबाठा) नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या व्यवहारात शासकीय नियमांना हरताळ फासत तब्बल ४०० कोटी रुपयांची लूट झाली असून, यासाठी मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने पालिका आयुक्तांवर दबाव आणल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. ( pcmc school uniform scam sanjay raut )

याप्रकरणी संबंधित मंत्री आणि पालिका प्रशासनावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. खासदार राऊत यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केले आहे.( pcmc )

ई-निविदा प्रणालीला बगल
पिंपरी-चिंचवड पालिकेतील काही माजी नगरसेवकांनी या गैरव्यवहाराची सविस्तर माहिती दिल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, ओढणी, स्वेटर, मोजे, रेनकोट, आणि दप्तरे या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कोणतीही ई-निविदा (E-Tender) प्रणाली राबवण्यात आली नाही. पारदर्शक पद्धतीला बगल देऊन सोलापूरमधील 'जगदंबा रेडिमेड ड्रेसेस सहकारी संस्थेला' हे कोट्यवधी रुपयांचे काम परस्पर देण्यात आले, ज्यामुळे पालिकेच्या तिजोरीचे मोठे नुकसान झाल्याची भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. ( pcmc )
Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
खासदार राऊत यांनी पत्रात दरांच्या तफावतीवर बोट ठेवत भ्रष्टाचाराचा आकडा मांडला आहे. "यापूर्वी भ्रष्टाचाराचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता, न्यायालयाने शालेय साहित्याचा प्रति विद्यार्थी दर २३९ रुपये निश्चित केला होता. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्त्वांना केराची टोपली दाखवली," असा आरोप राऊत यांनी केला.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
सोलापूरच्या संबंधित संस्थेला निविदा प्रक्रियेविना थेट ८१४ रुपये प्रति विद्यार्थी या दराने काम देण्यात आले. कोर्टाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा हा दर तब्बल ५७५ रुपयांनी अधिक आहे. या वाढीव दरामुळे संपूर्ण खरेदी व्यवहारात सुमारे ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे पत्रात म्हटले आहे. PCMC
५० ते ५५ कोटींची 'टक्केवारी' मंत्र्यांकडे?
या संपूर्ण प्रकरणात पालिका प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. निविदा प्रक्रियेविनाच सोलापूरच्या संस्थेला हे काम मिळावे, यासाठी राज्य मंत्रिमंडळातील एका अतिशय वरिष्ठ मंत्र्याने पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांवर थेट दबाव आणला होता. इतकेच नव्हे, तर या व्यवहारातील सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांची 'टक्केवारी' (कमिशन) संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचली असल्याचा दावाही राऊत यांनी पत्राद्वारे केला आहे. ( pcmc )
हेही वाचा: Crime News : पुण्यात ५.७९ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; सराईत आरोपी अटकेत
महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोषी मंत्री आणि भ्रष्ट पालिका प्रशासनाविरुद्ध तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर आता राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
