PCMC Flood : मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवडमध्ये पूरस्थिती गंभीर
PCMC Flood : महाराष्ट्र मिरर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.
2 मिनट पठन

PCMC Flood : ४,२०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
PCMC Flood : महाराष्ट्र मिरर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध पूरबाधित भागांतील सुमारे ४,२०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. महापालिकेने विविध भागांत निवारा केंद्रे उभारून तेथे भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. (PCMC Flood 4200 people evacuated)

आयुक्तांचे सतर्कतेचे आदेश
महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी पूरस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या भागांतील नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देत तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (PCMC Flood)
हेही वाचा: Rain Update : महाबळेश्वर, पाचगणीसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद!
आपत्कालीन यंत्रणा सज्ज
सततच्या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पूराचा धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने वेळेवर उपाययोजना करत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम हाती घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ही कारवाई केली.
Pune Rain : रेड अलर्टमुळे सिंहगड पर्यटकांसाठी बंद
पूरनिवारा केंद्रांमध्ये वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली असून तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक प्राथमिक उपचार दिले जात आहेत. याशिवाय भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, यासाठी संबंधित विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. (PCMC Flood)

Ashadhi wari 2026 : आळंदी जलमय, वारकऱ्यांसाठी PMC कडून पाणीकपात तात्काळ मागे
महापालिकेने शहरातील काही भागांना अतिधोका क्षेत्र म्हणून घोषित केले असून या भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यात भाटनगर, लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, पिंपळे निलखमधील पंचशीलनगर, रामनगर, बोपखेल, संजय गांधी नगर, पिंपळे गुरव आणि लक्ष्मीनगर या भागांचा समावेश आहे. या ठिकाणी नदीपात्राजवळील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका अधिक असल्याने प्रशासनाने सतत पाहणी सुरू ठेवली आहे. (PCMC Flood)

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी २ वाजेपर्यंत 'अ' क्षेत्रीय कार्यालयाच्या निवारा केंद्रांमध्ये ३००, 'ब' क्षेत्रात ९७५, 'ड' क्षेत्रात ९५०, 'ई' क्षेत्रात ९५, 'ग' क्षेत्रात ५८० आणि 'ह' क्षेत्रात सर्वाधिक १,३०० नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. (PCMC Flood)
RED ALERT FOR MUMBAI, PUNE GHATS AS IMD WARNS OF EXTREMELY HEAVY RAIN
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाचे ०२०-६७३३११११, ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
