मुख्य सामग्री पर जाएँ

Warakari Death : वारकऱ्याचा चेंगराचेंगरीने नव्हे, तर हृदयविकाराने मृत्यू; पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

1 मिनट पठन

Warakari Death

Warakari Death : पालखी सोहळ्यादरम्यान एका ६१ वर्षीय वारकऱ्याचा गर्दीत चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याच्या अफवा शहरभर पसरली होती.

पुणे, महाराष्ट्र मिरर

Warakari Death : आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान एका ६१ वर्षीय वारकऱ्याचा गर्दीत चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याच्या अफवांना पुणे पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. संबंधित वारकऱ्याचा मृत्यू गर्दीमुळे झालेला नसून, तो हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (कोरोनरी आर्टरी डिसीज) झाल्याचे पोलिसांनी अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. उमाकांत भालेराव (वय ६१) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. ( palkhi sohla warakari death heart attack )

Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?

घटना मुख्य गर्दीच्या ठिकाणची नाही

याबाबत माहिती देताना परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त (DCP) कृषीकेश रावळे यांनी सांगितले की, ही घटना पालखी सोहळ्याच्या मुख्य गर्दीच्या ठिकाणी घडलेली नाही. त्या भागात कोणतीही मोठी गर्दी किंवा धावपळ नव्हती. भालेराव यांना आधीपासूनच दम्याचा (अस्थमा) त्रास होता. पालखी सोहळ्यात सहभागी असताना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते जमिनीवर कोसळले.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

पोलिसांची तात्काळ मदत

घटनेचे गांभीर्य ओळखून तेथे उपस्थित असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुले यांनी भालेराव यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 Irani Cafe : ‘ईराणी‘ कॅफेत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ!

वैद्यकीय अहवालातून सत्य समोर

ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, भालेराव यांचा मृत्यू 'कोरोनरी आर्टरी डिसीज' म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारामुळे झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतरत्र पसरत असलेल्या चेंगराचेंगरीच्या चर्चा पूर्णपणे तथ्यहीन आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कुटुंबीयांची तक्रार नाही
भालेराव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले आहे. त्यांना आधीपासूनच श्वसनाचा व प्रकृतीचा त्रास होता, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. तसेच धार्मिक आणि वैयक्तिक कारणास्तव शवविच्छेदन (Post-Mortem) न करण्याची विनंतीही कुटुंबीयांनी केली असून, त्याबाबतचा अंतिम निर्णय कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रियेनुसार घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेयर करें