मुख्य सामग्री पर जाएँ

महापालिकेची साथरोग अलर्ट मोहीम

पावसाळ्यापूर्वी जलजन्य-कीटकजन्य आजार रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पूर्वतयारीचे आदेश

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

महापालिकेची साथरोग अलर्ट मोहीम

पावसाळ्यापूर्वी जलजन्य-कीटकजन्य आजार रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पूर्वतयारीचे आदेश

महाराष्ट्र मिरर
पुणे:
साथरोग नियंत्रणाची तयारी सुरू केली असून, क्षेत्रीय कार्यालयांना साथरोगासंबंधी प्रभावी नियंत्रणासाठी पूर्वतयारीचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. यामध्ये कीटकजन्य आजार, जलजन्य आजार व अन्य सांसर्गिक आजारांच्या प्रादुर्भावाचा समावेश असून, त्या संबंधीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जलजन्य आजारात कॉलरा, विषमज्वर, कावीळ, फ्लू, जीबीएस, स्क्रिप्टोस्पोरिडिओसिस या आजारांचा समावेश आहे. तर कीटकजन्य आजारात झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी आजारांचा समावेश आहे.

देण्यात आलेल्या सूचना…..
कीटक प्रतिबंधक उपायोजना

  • सर्व सेवकांनी नियमितपणे डासोत्पत्ती स्थानावर औषध फवारणी करणे, कीटकजन्य रुग्णांचा शोध घेणे.
  • कार्यक्षेत्रामधील संवेदनशील क्षेत्राची नोंद करून औषधफवारणी करावी.
  • साथरोग सर्वेक्षणामध्ये आशा सेविकांचा सहभाग घेणे, त्यांना कीटक शास्त्रीय प्रशिक्षण देणे, तसेच त्यांच्या मार्फतही ताप रुग्ण शोध मोहीम राबवणे.
  • साथरोग नियंत्रणासाठी अतिक्रमण, घनकचरा, मलः निसारण, भवन असे मनपाचे विविध विभागांमध्ये नियमित समन्वय ठेवणे.
  • जलजन्य आजार प्रतिबंधक उपाययोजना

    • पाणी उकळून आणि गाळून प्यावे
    • बाहेर जातानाही सोबत पाण्याची बाटली घेऊन जावे.
    • साबणाने आणि स्वच्छ पाण्याने योग्य पद्धतीने हात धुणे
    • पाणी दूषित होऊ नये म्हणून मानवी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
    • पुणे न्यूज

      शेयर करें