MLA Prashant Thakur : माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल जितिन शेट्टी : कळंबोलीमध्ये झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांनी माथाडी कामगारांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास कामगारांना दिला.
1 मिनट पठन

पनवेल जितिन शेट्टी : कळंबोलीमध्ये झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांनी माथाडी कामगारांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास कामगारांना दिला.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ माथाडी कामगार मेळावा आयोजित केला होता. कामगारांच्या हितासाठी पडेल तो संघर्ष करण्याची तयारी भाजपची आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.
या मेळाव्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे, भाजपचे माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट सेलचे उपाध्यक्ष संजय भगत, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, माजी नगरसेविका मोनिका महानवर, अमर ठाकूर, अशोक मोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते.
हेही वाचा: Panvel News : कळंबोलीतील शेकडो रहिवाशांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
- #Panvel News
- #माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर
- #MLa Prashant Thakur
- #माथाडी कामगारांच्या समस्या
- #राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे
- #शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे
- #भाजपचे माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट सेलचे उपाध्यक्ष संजय भगत
- #ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख
- #आमदार प्रशांत ठाकूर
- #Pnavel Vidhan Sabha Election
