मुख्य सामग्री पर जाएँ

Mira Road Crime News : मिरा-रोडमध्ये ज्वेलरी व्यापाऱ्याची 12.15 लाखांची फसवणूक; काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण कक्षाने दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

• क्रिप्टोकरेंसीमध्ये ट्रेडिंग करण्याच्या नावाखाली केला होता अपहार; वाराणसी येथून आरोपींना अटक करत 25 ग्रॅम सोन्याची चेन व क्रिप्टो करन्सी जप्त

व
विवेक

2 मिनट पठन

Mira Road Crime News

•क्रिप्टोकरेंसीमध्ये ट्रेडिंग करण्याच्या नावाखाली केला होता अपहार; वाराणसी येथून आरोपींना अटक करत 25 ग्रॅम सोन्याची चेन व क्रिप्टो करन्सी जप्त

मिरा रोड :- मिरा-रोड परिसरात क्रिप्टो करेंसीमध्ये ट्रेडिंग करण्याच्या बहाण्याने एका ज्वेलर्स व्यावसायिकाची 12 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा कुख्यात आरोपींना काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण कक्ष-1 च्या पथकाने जेरबंद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून अपहार केलेल्या रकमेतून खरेदी केलेले सोने, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि cryptocurrency जप्त करण्यात आली आहे.

L

मिरा रोडमधील भवानी गोल्ड, रामदेव पार्कचे मालक महेंद्र सिंह यांनी त्यांच्या दुकानातील कामगार रमाकांत जयप्रकाश शुक्ला याला मालाड, मुंबई येथून व्यवसायासंबंधी 12.15 लाख रुपये रोख रक्कम आणण्यास सांगितली होती. रमाकांत शुक्ला याने ही रक्कम आणल्यानंतर, त्याचा मित्र रितेश जयप्रकाश मिश्रा व निरज मनिषचंद्र झा यांच्यासोबत दुचाकीवरून मालाडहून मिरा रोडकडे येत होता. वाटेत सम्राट हॉटेल सिम्नलजवळ आल्यावर या दोघांनी "पुढे ट्रॅफिक पोलीस आहे, तुमच्याकडे रोख रक्कम आहे, तुम्ही खाली व्हा" असे सांगून रमाकांतला दुचाकीवरून उतरवले. त्यानंतर रितेश मिश्रा व निरज झा हे दोघे रकमेची बॅग घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाराणसीतून आवळले मुसक्या, 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण कक्षाला आरोपी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 26 ऑक्टोबर रोजी रात्री वाराणसी येथून विमानतळावर जाण्याच्या तयारीत असलेल्या रितेश जयप्रकाश मिश्रा आणि निरज मनिषचंद्र झा या दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये:

25 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची चेन

ॲपल कंपनीचा आयपॅड, एअर पॉड्स, आयफोन 11 मोबाईल आणि पांढऱ्या रंगाची ट्रॉली बॅग व रोख रक्कम

तसेच आरोपींनी coin DCX ॲपमध्ये खरेदी केलेली 4,89,119 रुपयांची क्रिप्टो करेंसी सुरक्षित करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण कक्ष-1 च्या पथकाने केली असून, पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.

हेही वाचा: Thane News : केदारनाथ विद्यामंदिर शाळेत दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; दोन पंख्यांसह आर्थिक मदत आणि मिठाईसाठी सहकार्य!

शेयर करें